शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना जाग; उत्पादनशुल्क सुस्तच

By admin | Updated: July 22, 2015 03:06 IST

पिंपरी-चिंचवड परिसरातील हातभट्टी दारूनिर्मितीचे आगार मानल्या जाणाऱ्या भाटनगरमध्ये उत्पादनशुल्क विभागाने छापे टाकून,

पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरातील हातभट्टी दारूनिर्मितीचे आगार मानल्या जाणाऱ्या भाटनगरमध्ये उत्पादनशुल्क विभागाने छापे टाकून, दोन दिवसांपूर्वी छापा टाकला. मोठ्या प्रमाणावर दारू साठा नष्ट केल्याचेही सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर या विभागाची कारवाई सुस्त पडली. विशेष म्हणजे, मंगळवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्यापेक्षा कितीतरी अधिक दारूसाठा नष्ट केला. ‘लोकमत’ने गावठी दारूच्या उच्छादाविषयी चालविलेल्या मोहिमेची दखल घेऊन पोलिसांनी आज कारवाई केली. भाटनगरच्या घराघरांत शिरून पोलिसांनी प्लॅस्टिक ड्रम, कॅन, हांडे, पातेली रीती केली. दारूसाठा लपवून ठेवलेल्या जागांचा शोध घेऊन पोलिसांनी मंगळवारी ११ वाजेपर्यंत भाटनगर दारूसाठामुक्त केले. ‘रूट मार्च’साठी रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स आणि पोलीस एकत्रित आले होते. सकाळी साडेनऊ वाजताच पोलीस पथके भाटनगरमध्ये दाखल झाली. पोलिसांना पाहताच भाटनगरमधील हातभट्टीविक्रेत्यांची तारांबळ उडाली. अनेक जण घरे उघडी ठेवून घराबाहेर निघून गेले. घराघरांत शिरून पोलिसांनी शोधमोहीम राबविली. घरांमध्ये; तसेच घरांच्या बाजूला सीमाभिंतीलगत अनेकांनी हातभट्टी तयार करण्याचे साहित्य लपवून ठेवले होते. पोलिसांनी कोपरान्कोपरा शोधून काढला. हातभट्टी तयार करण्यासाठी आवश्यक असे साहित्य ज्या ठिकाणी लपवून ठेवले होते, ती ठिकाणे शोधून काढून, हातभट्टीचा साठा नष्ट करण्यात आला. प्लॅस्टिक; तसेच लोखंडी ड्रम, कॅन, पातेली आणि हांडे अशा ज्या ज्या वस्तूंमध्ये हातभट्टीचा साठा होता, तो ओतण्यात आला. भाटनगरमधील रहिवाशांची या कारवाईमुळे पळापळ झाली. विशेष म्हणजे, या कारवाईत महिला पोलिसांचाही सहभाग होता. सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सैफन मुजावर, सचिन निकम, किशोर जगदाळे यांच्या पथकाने धडक कारवाई केली. उत्पादनशुल्क ई विभागाने भाटनगरमध्ये कारवाई केली आहे. आता भाटनगरमध्ये कोठेच हातभट्टीचा साठा आढळून येणार नाही, असा दावा १७ जुलैला केला होता. त्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना भाटनगरमध्ये मंगळवारी साडेनऊ ते अकरा या दीड तासाच्या कालावधीत भाटनगरच्या घराघरांतून दारूचे पाट वाहत असल्याचे पाहावयास मिळाले.(प्रतिनिधी)