शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिकेंद्रित अर्थसंकल्प हवा

By admin | Updated: October 14, 2016 05:44 IST

महापालिका शिक्षण मंडळाचे २०१७-१८ या पुढील वर्षातील विद्यार्थिकेंद्रित असलेले अंदाजपत्रक तयार झाले आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर

पिंपरी : महापालिका शिक्षण मंडळाचे २०१७-१८ या पुढील वर्षातील विद्यार्थिकेंद्रित असलेले अंदाजपत्रक तयार झाले आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर अंदाजपत्रकांची अंमलबजावणी होईल. मात्र, निविदा प्रक्रिया वेळेत न झाल्यास विद्यार्थ्यांवर पुन्हा शालेय साहित्य मिळण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. दरवर्षी महापालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पाअगोदर शिक्षण मंडळातर्फे अंदाजपत्रक मांडले जाते. आगामी महापालिका निवडणुकीमुळे आचारसंहिता डिसेंबरमध्यचे लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाने आॅक्टोबर महिन्यातच शिक्षण मंडळाचा अर्थसंकल्प तयार केला आहे. यासाठी सुमारे १५१ कोटी ५ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या अंदाजपत्रकात टॅब खरेदी-प्रशिक्षण, ई-लर्निंग, गणवेश, शालेय साहित्य, पावसाळी साधने, वॉटर फिल्टर, सौरऊर्जा सिस्टीम, क्रीडा साहित्य, आगरोधक यंत्रणा, स्वेटर आदी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या गोष्टींचा समोवश करण्यात आला आहे. तसेच, मुलींच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचींही तरतूद सुचविली आहे. निविदा प्रक्रियेमुळे दर वर्षी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळण्यास विलंब होतो. यामुुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. परंतु, या वर्षी शिक्षण मंडळाने पुढील वर्षाचे २०१७-१८चे अंदाजपत्रक आॅक्टोबरमध्येच तयार केले आहे. यामुळे डिसेंबरपूर्वीच या प्रस्तावास मंजुरी भेटेल, अशी शक्यता आहे. असे झाले तर शिक्षण मंडळास विद्यार्थिकेंद्रित असणाऱ्या या तरतुदी अंमलात आणण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकेल. एवढे असूनही पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना योग्य वेळेत शालेय साहित्य हातात मिळतील का, यावर शंका उपस्थित केल्या जात आहेत. शिक्षण मंडळाने तयार केलेल्या अर्थसंकल्पास लवकर मंजुरी मिळावी. तसेच, त्याची अंमलबजावणी तत्काळ व्हावी, अशी मागणी पालक व शिक्षक संघटनांकडून होत आहे. (प्रतिनिधी)