कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रवेश बंद; मृत्यूच्या घटना वाढल्या, प्रशासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 05:40 PM2023-08-29T17:40:14+5:302023-08-29T17:52:29+5:30

कासारसाई धरण प्रशासनाच्या वतीने धरण पाणलोट क्षेत्रात प्रवेश बंद केला आहे...

Access to Kasarasai Dam catchment area closed; Deaths increased, administration's decision | कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रवेश बंद; मृत्यूच्या घटना वाढल्या, प्रशासनाचा निर्णय

कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रवेश बंद; मृत्यूच्या घटना वाढल्या, प्रशासनाचा निर्णय

googlenewsNext

चांदखेड (पुणे) : दोन वर्षांपर्यंत पाण्यात बुडून मरण पावण्याच्या घटनेचे हाॅटस्पाॅट ठरलेल्या कासारसाई धरण प्रशासनाच्या वतीने धरण पाणलोट क्षेत्रात प्रवेश बंद केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहर, आयटी नगरी हिंजवडीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कासारसाई धरण परिसरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दोन वर्षापूर्वी तीन महिन्यांत या ठिकाणी आठ शालेय तसेच महाविद्यालयीन तरुणांना धरणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने जीव गमवावा लागला होता.

त्यानंतर पाटबंधारे विभागाकडून कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या बाजूने तारेचे कंपाउंड करण्यात आले आहे. पाणलोट क्षेत्रात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच त्या आशयाचे फलक जागोजागी लावण्यात आले आहेत. यामुळे यावर्षी अपघाताची एकही दुर्दैवी घटना कासारसाई धरण परिसरात घडली नाही. कासारसाई धरण पाणलोट क्षेत्रात पर्यटकांना प्रतिबंध करण्यासाठी तार कंपाउंड करण्यात आले आहे.

Web Title: Access to Kasarasai Dam catchment area closed; Deaths increased, administration's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.