पैसे परत मागितल्याने शिवीगाळ व धक्काबुक्की करून महिलेवर अत्याचार

By नारायण बडगुजर | Published: July 1, 2023 12:58 PM2023-07-01T12:58:59+5:302023-07-01T12:59:16+5:30

तुझ्या नवऱ्याला सर्व सांगतो, अशी धमकीही आरोपीने दिली होती

Abused the woman by abusing and pushing her for demanding money back | पैसे परत मागितल्याने शिवीगाळ व धक्काबुक्की करून महिलेवर अत्याचार

पैसे परत मागितल्याने शिवीगाळ व धक्काबुक्की करून महिलेवर अत्याचार

googlenewsNext

पिंपरी : सणाकरीता दिलेले पैसे परत मागितल्याने महिलेला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच महिलेवर बलात्कार करून धमकी दिली. पिंपळे गुरव येथे १ जून २०१७ ते ४ जून २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला. 

पीडित महिलेने याप्रकरणी ३० जून २०२३ रोजी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार इसाक रज्जाक शेख (वय ३७, रा. पिंपळे गुरव) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी पीडित महिलेच्या ओळखीचा आहे. त्याने २०१७ मध्ये सणासाठी फिर्यादीकडून १५ हजार रुपये घेतले. फिर्यादीने अनेकवेळा पैसे मागितले. परंतु आरोपीने फिर्यादीस पैसे परत केले नाही. फिर्यादी घरी एकटीच असताना आरोपी रात्री फिर्यादीच्या घरी आला. तू मला पैसे का मागते, असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच फिर्यादीवर बलात्कार केला. तुझ्या नवऱ्याला सर्व सांगतो, अशी धमकीही आरोपीने दिली. तसेच त्याच्या रिक्षामध्ये बसवून वेगवेगळ्या लाॅजवर नेऊन १० ते १२ वेळा फिर्यादीवर बलात्कार केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Abused the woman by abusing and pushing her for demanding money back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.