भरधाव डंपरची दुचाकीला धडक; चाक डोक्यावरून गेले, युवतीचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 15:41 IST2025-10-10T15:39:48+5:302025-10-10T15:41:47+5:30
आयटी परिसरात अवजड वाहनांच्या अपघाताचे सत्र काही थांबताना दिसत नसल्याने नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे

भरधाव डंपरची दुचाकीला धडक; चाक डोक्यावरून गेले, युवतीचा जागीच मृत्यू
हिंजवडी : आयटी परिसरात भरधाव डंपरच्या धडकेत पुन्हा एकाचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली. शुक्रवारी (दि.१०) सकाळी अकराच्या सुमारास माण रस्त्यावर असणाऱ्या पांडव नगर येथे डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा बळी गेला. भारती मिश्रा (वय ३०) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव असून, घटनेनंतर चालक मिक्सर घेऊन पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
दरम्यान, आयटी परिसरात अवजड वाहनांच्या अपघाताचे सत्र काही थांबताना दिसत नसल्याने नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हिंजवडी-माण रस्त्यावरील पांडव नगर चौकजवळील 'स्ट्रीट ऑफ युरोप' परिसरात सिमेंट मिक्सर वाहनाने महिलेच्या दुचाकीला धडक दिली. ती खाली पडल्याने चाक तीच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हिंजवडी पोलीस ठाण्यात सुरू आहे.