मोरवाडी परिसरातील भंगार दुकानाला आग, १० किलोमीटर अंतरावरूनही दिसतायेत धुराचे लोळ

By विश्वास मोरे | Updated: February 21, 2024 14:19 IST2024-02-21T13:50:50+5:302024-02-21T14:19:00+5:30

आगीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बघायची गर्दी झाली होती. तर काहीजण व्हिडिओ चित्रण करीत होते....

A fire broke out at a scrap shop in Morwadi area. | मोरवाडी परिसरातील भंगार दुकानाला आग, १० किलोमीटर अंतरावरूनही दिसतायेत धुराचे लोळ

मोरवाडी परिसरातील भंगार दुकानाला आग, १० किलोमीटर अंतरावरूनही दिसतायेत धुराचे लोळ

पिंपरी : मोरवाडी न्यायालय जवळील एका भंगाराच्या दुकानाला आग लागल्याने बुधवारी दुपारी मोठ्या प्रमाणावर धुराचे  लोळ दिसून येत होते. पुणे मुंबई महामार्गावरून मोरवाडी चौकातून पिंपरी न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला एका भंगाराच्या दुकानात आग लागली. त्यानंतर काहीच वेळात अग्निशामक दलाचे पथक दाखल झाले.

दरम्यान ही आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ दिसून येत होते. तळवडे, थेरगाव, काळेवाडी, वाकड, निगडी अशा सुमारे दहा किलोमीटरच्या परिघातून पिंपरी कडे पाहिल्यानंतर धुराचे लोळ  दिसून येत होते. त्यामुळे दुचाकीस्वार, चार चाकिस्वार गाड्या थांबून या आगीचे, धुराचे चित्रण करण्यात करीत असल्याचे दिसून येत होते. अग्निशामक दलाचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

फोटो व्हिडिओ काढण्यात नागरिक व्यस्त

आगीचं चित्रण आपल्या मोबाईल मध्ये करण्यासाठी नागरिक व्यस्त असल्याचे दिसून आले. आगीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बघायची गर्दी झाली होती. तर काहीजण व्हिडिओ चित्रण करीत होते.

Web Title: A fire broke out at a scrap shop in Morwadi area.