पुण्यात 'नासा'मध्ये धातू विकण्याचे आमिष दाखवून ४९ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 07:50 PM2022-06-03T19:50:00+5:302022-06-03T19:50:02+5:30

फसवणूक करून जीवे मारण्याची धमकीही दिली...

49 lakh fraud by showing lure to sell metal in NASA america pune crime news | पुण्यात 'नासा'मध्ये धातू विकण्याचे आमिष दाखवून ४९ लाखांची फसवणूक

पुण्यात 'नासा'मध्ये धातू विकण्याचे आमिष दाखवून ४९ लाखांची फसवणूक

googlenewsNext

पिंपरी : आरपी धातू विकण्याचे आमिष दाखवून सहा जणांनी मिळून एकाची ४९ लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली. हा प्रकार १९ जून २०१९ ते २ जून २०२२ या कालावधीत सुसगाव येथे घडला. सुभाष गुलाब ससार (वय ४९, रा. सुसगाव, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नवनाथ लांडगे (रा. पौड), नितीन धोत्रे (रा. भोसरी), संजय वळे (रा. पौडगाव), सोनाली उमाकांत जाधव (सांगवी), पूजा गरुड (कोथरूड), संगीता नगरकर रा. ( कोथरूड ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सोनाली उमाकांत जाधव, संगीता नगरकर यांना याप्रकरणी अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर यांनी सांगितले.

आरोपींनी पूर्वनियोजित कट करून फिर्यादी, त्यांचा भाऊ प्रकाश गुलाब ससार, राजेश गुलाब ससार यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त फायदा मिळवून देण्याचे तसेच आरोपींनी आरपी धातूचे मौल्यवान भांडे नासा, अमेरिका येथे विक्री करायचे आहे. त्याची किंमत ५००० कोटी रुपये मिळणार असून त्यातील फिर्यादी यांना ५०० कोटी रुपये फायदा होणार असल्याचे सांगितले.

फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी सरकारी कागदपत्रे आणि त्यावर कोट्यवधी रुपयांची नोंद असल्याचे दाखवले. फिर्यादी आणि त्यांच्या भावाच्या नावाने तीन कोरे चेक घेऊन फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून वेळोवेळी ३७ लाख रुपये आरटीजीएसद्वारे आणि १२ लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. एकूण ४९ लाख रुपये आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून घेतले.

आरोपींनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे फिर्यादी यांची गुंतवणूक रक्कम आणि त्यावरील परतावा परत न देता रकमेचा वापर करून फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सावरगाव पौड येथील शेतजमीन कमी भावात विकण्यास भाग पाडले. फिर्यादी यांच्या रकमेचा आरोपींनी अपहार केला. फिर्यादी यांनी त्यांची रक्कम मागितली असता आरोपींनी त्यांना आणि त्यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: 49 lakh fraud by showing lure to sell metal in NASA america pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.