शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?

युवा फलंदाज शुबमन गिल ( Shubman Gill ) हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघासोबत राखीव खेळाडू म्हणून गेला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 06:07 PM2024-06-15T18:07:57+5:302024-06-15T18:08:30+5:30

whatsapp join usJoin us
Did Shubman Gill unfollow captain Rohit Sharma on Instagram? Gill being sent home from US on disciplinary grounds are grossly incorrect | शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?

शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Team India Rumour:  युवा फलंदाज शुबमन गिल ( Shubman Gill ) हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघासोबत राखीव खेळाडू म्हणून गेला आहे. आज भारतीय संघ फ्लोरिडा येथे अ गटातील शेवटचा साखळी सामना कॅनडाविरुद्ध खेळणार आहे. त्यानतंर सुपर ८ लढतींसाठी संघ कॅरेबियन बेटांसाठी रवाना होणार आहे. पण, भारतीय संघासोबत शुबमन गिल व आवेश खान हे राखीव खेळाडू प्रवास करणार नसल्याचे वृत्त आहे. या दोघांना BCCI ने रिलीज केले आहे. पण, या वृत्तावरून आता नकारात्मक चर्चा पसरू लागल्या आहेत.


कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्यात वाद झाला आहे... गिलने रागात हिटमॅनला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे... बीसीसीआयने गिलवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे... अशा अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. 


नेमकं खरं काय?
गुरुवारपर्यंत गिल आणि आवेश हे दोघंही फ्लोरिडामध्ये होते. या दोघांनी बुधवारी चार्टर्ड फ्लाइटने न्यूयॉर्कहून फोर्ट लॉडरडेलला भारतीय संघासह उड्डाण केले. बुधवारी दुपारी लाँग आयलंडमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यानंतर भारत आणि अमेरिका या दोन्ही संघांसाठी चार्टर विमानाची सोय केली होती. गिल आणि आवेश या दोघांचा प्रवास फक्त यूएस लेगपर्यंत होता. या स्पर्धेदरम्यान प्रमुख १५ खेळाडूंपैकी कुणाला अनपेक्षित दुखापत झाली तर खबरदारीचा उपाय म्हणून गिल व आवेश यांना BCCI ने राखीव खेळाडू म्हणून सोबत राहण्यास सांगितले होते. 


निवड समितीने गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान यांना राखीव खेळाडू म्हणून निवडले होते.  सध्या रिंकू आणि खलील संघासोबत राहू शकतात आणि ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे प्रवास करू शकतात. 

शुबमन गिलची इंस्टाग्रामबाबत बातमी
राखीव खेळाडू शुबमन गिलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केल्याची चर्चा आहे. पण, शुबमनच्या इंस्टाग्राम फॉलो लिस्टमध्ये रोहितसह विराट कोहली, सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी  आणि इतरांचे नाव आहे. पण, त्यात रोहितचे नाव नाही.  पण, शुबमन आधी रोहितला फॉलो करत होता का, याचे उत्तर कोणाकडेच नाही.  

शिस्तभंगाची कारवाई?
काही मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्मा व संघ व्यवस्थापन २४ वर्षीय गिलच्या वागण्यावर नाखूश होते. भारतीय संघासोबत असूनही गिल सराव शिबिरात सहभाग घेत नव्हता. तो त्याच्या वैयक्तिक बिझनेसवर अधिक लक्ष केंद्रीत करून होता. भारत-पाकिस्तान लढतीतही तो डगआऊटमध्ये दिसला नव्हता. पण, हाती आलेल्या वृत्तानुसार याही अफवा आहेत. त्याच्यावर शिस्तभंगाची अशी कोणतीच कारवाई केलेली नाही.  
 

Web Title: Did Shubman Gill unfollow captain Rohit Sharma on Instagram? Gill being sent home from US on disciplinary grounds are grossly incorrect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.