इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 06:15 PM2024-06-15T18:15:16+5:302024-06-15T18:26:19+5:30

काही जण फिटनेस रुटीन फॉलो करायचं असेल किंवा वजन कमी करायचं असेल, तर इंटरनेटवर सर्च करतात आणि इंटरनेटवर दिलेली माहिती पाहून त्यांचं रुटीन बदलतात.

never trust on internet diet can be hard harmful for overall health | इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?

इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?

स्मार्टफोन हा जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. इंटरनेटवर आपण सर्वच जण विविध गोष्टी शेअर करत असतो. काही जण फिटनेस रुटीन फॉलो करायचं असेल किंवा वजन कमी करायचं असेल, तर इंटरनेटवर सर्च करतात आणि इंटरनेटवर दिलेली माहिती पाहून त्यांचं रुटीन बदलतात.

तुम्ही देखील असंच करत असाल तर आजपासून हे करणं बंद करा, कारण इंटरनेटवर ट्रेंड होणारा फिटनेस आणि डाएट प्लॅन तुमच्या आरोग्यासाठी घातक असू शकतो. तज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही प्रकाराचं डाएट फॉलो करून नये. हे जीवघेणं देखील ठरू शकतं.

केटो डाएट गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. वजन कमी करण्यासाठी सेलिब्रिटी आणि सामान्य लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर याची चर्चा केली जात आहे. पण एका अभिनेत्रीचा दीर्घकाळ केटो डाएट केल्यामुळे मृत्यू झाला.तिच्या शरीरात अनेक पोषक तत्वांची कमतरता होती. अशा परिस्थितीत, तुम्ही इंटरनेट किंवा सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेला डाएट किंवा फिटनेस रुटीन फॉलो करू नये.

वजन कमी करणं हे न्यूट्रिशनच्या सल्ल्याशिवाय करू नये. ते आपल्या शरीरानुसार आपल्यासाठी परफेक्ट डाएट प्लॅन बनवतात. दुसरीकडे, इंटरनेटवर जी काही माहिती दिली जाते ती कॉमन आहे.

कोणत्याही वेबसाइटला एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या मेडिकल हिस्ट्रीबद्दल आणि इतर लक्षणांबद्दल काहीही माहिती नसते, म्हणून इंटरनेटवर कधीही पूर्ण विश्वास ठेवू नये. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच तुम्ही डाएट प्लॅन करा, कारण तुमच्या शरीराला कोणत्या गोष्टींची गरज आहे आणि तुम्ही कोणत्या गोष्टी कमी करू शकता हे केवळ तज्ज्ञच सांगू शकतात. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. 
 

Web Title: never trust on internet diet can be hard harmful for overall health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.