विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स

ICC T20 World Cup 2024 IND vs CANADA Live Scorecard - भारतीय संघाने सुपर आठ फेरीतील स्थान अखेरच्या साखळी सामन्याआधीच निश्चित केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 07:11 PM2024-06-15T19:11:55+5:302024-06-15T19:12:37+5:30

whatsapp join usJoin us
icc T20 World Cup 2024 live T20 int cricket match ind vs Canada scorecard online - Team India having a chat with umpires, TOSS DELAYED IN LAUDERHILL, Next inspection at 8pm. | विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स

विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC T20 World Cup 2024 IND vs CANADA Live Scorecard - भारतीय संघाने सुपर आठ फेरीतील स्थान अखेरच्या साखळी सामन्याआधीच निश्चित केले आहे. अ गटात अव्वल स्थान पटकावल्यानंतर आज  भारतीय संघ कॅनडाविरुद्ध खेळेल. भारताने सातत्यपूर्ण कामगिरी करत हा सामनाही मोठ्या फरकाने जिंकायला पाहिजे. या सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन संघात काही बदल करणार की तोच संघ खेळणार याकडे लक्ष लागले आहे. विराट कोहलीचा फॉर्म ही सध्या संघासाठी चिंतेची बाब बनली आहे.

 
फ्लोरिडा येथे हा सामना होणार आहे आणि इथे काल अमेरिका व आयर्लंड यांच्यातला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील पॅक अप निश्चित झाले. आजही भारत-कॅनडा लढतीवर पावसाचे सावट आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत खेळपट्टीवरील कव्हर्स काढले गेले नव्हते, परंतु पाऊसाने विश्रांती घेतली होती. रोहित शर्मा, विराट कोहली व हार्दिक पांड्या अम्पायरसोबत चर्चा करताना दिसले. मैदानावरील ओलाव्यामुळे कदाचित विराट नाराज झालेला पाहायला मिळाला. पण, ढगाळ वातावरणामुळे नाणेफेकीला विलंब होणार आहे आणि ८ वाजता खेळपट्टीची पुन्हा पाहणी केली जाणार आहे. 

सुपर ८ साठी पात्र ठरलेले संघ
भारत
अफगाणिस्तान
ऑस्ट्रेलिया
वेस्ट इंडिज
दक्षिण आफ्रिका
अमेरिका

टीम इंडियाचे वेळापत्रक
२० जून - अफगाणिस्तान वि. भारत, किंग्स्टन ओव्हल - रात्री ८ वाजल्यापासून
२० जून - ऑस्ट्रेलिया वि. D2 , सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ स्टँड - पहाटे ६ वाजल्यापासून
२२ जून - भारत वि. D2, सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ स्टँड - रात्री ८ वाजल्यापासून
२२ जून - अफगाणिस्तान वि. ऑस्ट्रेलिया, अर्नोस व्हॅल ग्राउंड, किंगस्टन - पहाटे ६ वाजल्यापासून 
२४ जून - ऑस्ट्रेलिया वि. भारत, डॅरेन सॅमी नॅशनल स्टेडियम, सेंट ल्युसिया - रात्री ८ वाजल्यापासून  
२४ जून - अफगाणिस्तान वि. D2, अर्नोस व्हॅल ग्राउंड, किंगस्टन - पहाटे ६ वाजल्यापासून  

Web Title: icc T20 World Cup 2024 live T20 int cricket match ind vs Canada scorecard online - Team India having a chat with umpires, TOSS DELAYED IN LAUDERHILL, Next inspection at 8pm.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.