शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत गणेशोत्सवासाठी ३८२० पोलिसांचा बंदोबस्त तैनात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 14:03 IST

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत...

ठळक मुद्देउद्योगनगरी : आयुक्तालयाने मागविली १३२० कर्मचाऱ्यांची जादा कुमक सीसीटीव्ही उभारण्याचे मंडळांना आवाहनअँटी गुंडा स्कॉड, छेडछाड प्रतिबंधक पथक तयार मुख्य रस्ते, गर्दीच्या ठिकाणी तसेच महत्वाच्या गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी बंदोबस्त

पिंपरी : राज्य राखीव दलाच्या एका तुकडीसह एक हजार होमगार्ड, १९० पोलीस कर्मचारी आणि ३० अधिकारी अशी जादा कुमक मागविण्यात आली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अडीच हजार कर्मचारी असे ३८२० अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून गणेशोत्सवादरम्यान बंदोबस्त राहणार आहे. 
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत निगडी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, एमआयडीसी भोसरी, सांगवी, हिंजवडी, वाकड, दिघी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, चाकण, आळंदी, चिखली असे एकूण १५ पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्यांतर्गत गणेशोत्सवादरम्यान बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. आयुक्तालयांतर्गत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. शहरातील मुख्य चौक, मुख्य रस्ते, गर्दीच्या ठिकाणी तसेच महत्वाच्या गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी बंदोबस्त करण्यात येत आहे. पोलीस मित्र, नागरिक पोलीस आदी विविध संस्था, संघटना व मंडळांचे बंदोबस्तासाठी सहकार्य घेण्यात येणार आहे. वाहतूक विभागातर्फे एक सहायक पोलीस आयुक्त, नऊ पोलीस निरीक्षक, ११ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक तसेच १५७ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. गणेशोत्सवादरम्यान गर्दीच्या ठिकाणी, मुख्य रस्ते, चौक आदी ठिकाणी वाहतूक नियमन करण्यात येणार आहे. तसेच वेळावेळी वरिष्ठ अधिकारी अशा ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहेत. गस्त घालण्यासाठीही वाहतूक विभागातर्फे पथक नियुक्त केले आहे.  गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. १०७ जणांवर ही कारवाई झाली. अँटी गुंडा स्कॉड, छेडछाड प्रतिबंधक पथक तयार करण्यात आले आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यानही ही पथके सक्रिय राहणार असून, पोलिसांकडून चोख बंदोबस्त राहणार आहे. 
घरगुती गणेशाला मंगळवारी निरोप देण्यात येणार आहे. दीड दिवसाच्या घरगुती गणेश मूर्तीचे काही भक्तांकडून घाटांवर विसर्जन करण्यात येते. अशा घाटांवर पोलीस बंदोबस्त राहणार आहे. त्यासाठी महापालिका, वाहतूक विभाग व अग्निशामक दल यांच्याशी समन्वय साधण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
............
सीसीटीव्ही उभारण्याचे मंडळांना आवाहन
मिरवणूक, ध्वनिक्षेपक आदी विविध परवानग्या देण्यासाठी पोलीस ठाण्याच्या पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. मूर्तीच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक किंवा स्वयंसेवक तसेच गर्दी, चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून स्वयंसेवक नियुक्त करण्याच्या सूचना मंडळांना करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवPoliceपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड