नराधम मामाकडून १४ वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार; पिंपरीतील संतापजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 17:20 IST2022-07-03T17:20:28+5:302022-07-03T17:20:39+5:30
मुलीच्या मावस भावाने अत्याचाराचा हा प्रकार पाहिला असता मामाने त्यालाही मारहाण केली

नराधम मामाकडून १४ वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार; पिंपरीतील संतापजनक घटना
पिंपरी : मामाने अल्पवयीन भाचीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. मुलीच्या मावस भावाने अत्याचाराचा हा प्रकार पाहिला असता मामाने त्यालाही मारहाण केली. हा प्रकार १७ ते २६ जून आणि १ जुलै रोजी पिंपरी परिसरात घडला.
याप्रकरणी १४ वर्षीय मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार २९ वर्षीय मामाला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मामाने भाचीवर वेळोवेळी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी मामा हा भाचीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असताना भाची ओरडली. त्यावेळी तिचा मावसभाऊ तिथे आला. मामाने त्यालाही मारहाण केली. त्यानंतर आरोपी मामाने फिर्यादीच्या घरातील कपाटाच्या काचा फोडून नुकसान केले.