थंडीमध्ये फिरण्यासाठी उत्तम पर्याय आहेत 'ही' ठिकाणं!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 06:42 PM2018-12-23T18:42:16+5:302018-12-23T18:47:26+5:30

ख्रिसमस, न्यू ईयरसाठी फिरायला जाण्याचा अनेकांचा प्लॅन असेल. परंतु जर तुम्हाला निसर्गरम्य ठिकाणं, ऐतिहासिक किंवा अध्यात्मिक ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही खास ऑप्शन्स सांगणार आहोत. जाणून घेऊया त्या सुंदर ठिकाणांबाबत ज्यांना तुम्ही भेट देऊ शकता आणि बजेट ट्रिप प्लॅन करू शकता.

छोटे रस्ते, उंच उंच आलिशान महाल आणि हवेल्या आणि इतरही अनेक ऐतिहासिक ठिकाणं यांचा आस्वाद घेण्याची इच्छा असेल तर एकदा तरी जैसमेरला भेट द्या. हे शहरी इतिहासातील अनेक घटनांची ग्वाही देतं. येथे अनेक जैन मंदिरंही असून 12व्या आणि 15व्या शतकात तयार करण्यात आली आहेत. या शहराचं वैशिष्ट म्हणजे, या शहरामध्ये फिरण्यासाठी तुम्हाला कोणत्याही गाडीची गरज भासणार नाही. हे संपूर्ण शहर तुम्ही पायी चालत फिरू शकता.

कर्नाटक म्हणजे निसर्गसौंदर्याने नटलेला प्रदेश असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. या राज्यातील कोडगु डोगंर दऱ्यांसोबतच सगळीकडे हिरवी शाल पांघल्याप्रमाणे हिरवळ पसरली आहे. चहा, कॉफीचे मळे आहेत, त्यामुळे या प्रदेशाला भारतातील स्कॉटलॅन्ड असंही म्हणतात. येथील ओंकारेश्वर मंदीर, अब्बी फॉल्स आणि किल्ला प्रसिद्ध आहे.

अध्यात्मिक शहराच्या शोधात असाल तर पद्दुचेरी हे शहर तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. येथे ऋषी अगस्त्यांची भूमी म्हणून ओळखलं जात असून वैदिक संस्कृतीचं केंद्र म्हणूनही हे शहर प्रसिद्ध आहे. येथे 12व्या शतकामध्ये जेव्हा अरविंदो आश्रम तयार झालं त्यावेळी या शहरची ख्याती आणखी वाढली. याव्यतिरिक्त पॅराडाइझ बीचवर डॉल्फिनच्या नेत्रसुखद कवायती पाहणं अत्यंत आनंददायी असतं.

डोंगरदऱ्यांमध्ये वसलेलं हम्‍पी हे ऐतिहासिक शहर अनेक देशी-विदेशी पर्यटकांचा आकर्षणाचा विषय. या शहरामध्ये मोठे-मोठे महाल, शाही मंडप, गड यांसारखी अनेक शिल्प आहेत. येथील ऐतिहासिक रचना पाहून य शहरातील समृद्ध संस्कृतीचा प्रत्यय येतो.

डोंगरावर वसलेले हे शहर अनेक पर्यटकांचा कुतुहलाचा विषय. येथील हिरवळ आणि निळेशार समुद्र पाहणं फार आनंददायी असतं. याव्यतिरिक्त येथील नितळ पाण्यामध्ये रंगीबेरंगी माशांना पोहताना पाहणं फार सुंदर असतं.