मनालीला फिरायला जायचा विचार करताय? मग 'फूल टू पैसा वसूल' ट्रिप होण्यासाठी वापरा 'या' टिप्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 01:08 PM2021-03-15T13:08:53+5:302021-03-15T13:21:21+5:30

manali hill station a maiden trip to himalayan town : मनाली हे भारतातील हिमाचल प्रदेशात असून ब्यास नदीच्या काठावर समुद्रसपाटीपासून 6725 फूट उंचीवर आहे.

जर तुम्ही भारतातील एखाद्या हिल स्टेशनला भेट देण्याचा प्लॅन ठरवत असाल तर तुमच्यासाठी हिमालयच्या पायथ्याशी वसलेले मनाली शहर सर्वात परफेक्ट असेल. मनाली हे भारतातील हिमाचल प्रदेशात असून ब्यास नदीच्या काठावर समुद्रसपाटीपासून 6725 फूट उंचीवर आहे.

मनालीला जाणे म्हणजे कोणत्याही निसर्गप्रेमीचे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. तुम्ही मनालीच्या सहलीचीही योजना आखत असाल तर तुम्हाला या आधी काही गोष्टी माहीत असायला हव्यात.

मनालीला जाण्यासाठी भुंटर विमानतळ हा उत्तम मार्ग आहे. बसमध्ये तुम्हाला कंटाळा येईल, पण सौंदर्य बघायलाही मिळेल. दिल्ली ते मनालीचा प्रवास बसने 14 तासांचा आहे. त्याचवेळी, जर तुम्ही धर्मशाळा येथे थांबून मनालीला जायचा विचार करत असला तर हे अंतर 9 तासांचे होते.

ओल्ड मनालीपेक्षा सेंट्रल मनाली हे अधिक गर्दी असलेले शहर आहे. मनालीमध्ये अनेक बजेटमध्ये हॉटेलसुद्धा सहज मिळतात. खाद्यपदार्थांबाबत बोलायचे झाल्यास, तेथील हॉटेलमध्ये बहुतेक भारतीय, तिबेट आणि मेक्सिकन खाद्यपदार्थ मिळतात. अनेक ठिकाणी सुशी सुद्धा मिळते.

बजेटमध्ये तुम्ही मनालीतील लहानशा वशिष्ठात राहू शकता. वशिष्ठ ब्यास नदीच्या पलीकडे आणि ओल्ड मनालीजवळ महामार्गावर आहे. ओल्ड मनालीमध्ये इंटरनेट सुविधा चांगली आहे. बर्‍याच कॅफे येथे विनामूल्य वाय-फाय सुविधा देखील देतात. सेंट्रल मनालीमधील मॉल रोडवर बरीच एटीएम आहेत.

अॅडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी मनाली सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही रॉक क्लायंबिंग, ट्रेक्स, पॅराग्लायडिंग आणि झोरबिंगचा आनंद घेऊ शकता. या सर्वांसाठी ओल्ड मनालीमधील एजन्सीशी संपर्क साधावा लागतो.

कोरड्या हंगामात तुम्ही व्हाइट वॉटर राफटिंग करू शकता. पावसाळ्यात नदीचा वेग खूप जास्त होतो. मनालीजवळील सोलानफ व्हॅलीमध्ये हिवाळ्यामध्ये स्कीइंग करता येते.

याचबरोबर, तुम्हाला मनालीच्या पुढे जायचे असेल तर कुल्लूला जाऊ शकता. हे मनालीपासून तीन तासांच्या अंतरावर आहे.

कुल्लू येथील मंदिरे, देवदार आणि पाइन वृक्षांनी भरलेल्या सुंदर घनदाटीसाठी प्रसिद्ध आहे. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही मनालीनंतर कसोललाही जाऊ शकता.

Read in English