'या' चर्चमध्ये २५ डिसेंबर नव्हे तर ६ जानेवारील ख्रिस्मस साजरा होतो, कारण वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 05:37 PM2021-12-24T17:37:27+5:302021-12-24T17:50:53+5:30

सगळ्याच चर्चमध्ये ख्रिसमससाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. नाताळच्या निमित्ताने सर्व चर्चमध्ये विशेष प्रार्थना केली जाते. चर्चमध्ये येणाऱ्यांना केक खाऊ घालून त्यांचे तोंडही गोडही केले जात आहे.मात्र जगात सर्वात जुने चर्च जिथे 6 जानेवारीला ख्रिसमस साजरा होतो. तुम्हाला माहितेय का याबद्दल?

दरवर्षी २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसचा सण जगभरात आनंदाने आणि थाटामाटात साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्मातील लोकांसाठी ख्रिसमस हा सण असला, तरी आजच्या काळात तो सर्वजण साजरा करतात. असे म्हणतात की, २५ डिसेंबर रोजी देवाचे पुत्र प्रभु येशूचा जन्म झाला.

ख्रिसमसच्या दिवशी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करण्याला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक शहरात चर्च आहेत आणि प्रत्येक चर्चची स्वतःची श्रद्धा देखील आहे. हा सण अत्यंत पवित्र आहे.

पण तुम्हाला माहित आहे का की, जगात असे सुद्धा चर्च आहे, जिथे ख्रिसमस २५ डिसेंबर ऐवजी ६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. असे म्हणतात की, ख्रिस्ती धर्माचा उदय येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरच झाला. त्या वेळी आर्मेनियन अपोस्टोलिक चर्चचाही उदय झाला.

असेही म्हटले जाते की, चौथ्या शतकात राजा टिरिडेट्सने ख्रिश्चन धर्माला आर्मेनियाचा राज्य धर्म बनवला. एवढेच नाही तर, त्या राजाने ग्रेगरीला पहिला कॅथलिक बनवले आहे. असे मानले जाते की, ग्रेगरीने येशूला पृथ्वीवर उतरताना पाहिले होते.

ग्रेगरीनेच राजाला अर्मेनियामध्ये चर्च बांधण्याचा प्रस्ताव दिला होता. आता अर्मेनिया हे जगातील सर्वात जुने चर्च मानले जाते. आजच्या काळात अर्मेनिया हा ख्रिश्चन शासित देश बनला.

परंतु असे म्हटले जाते की, अर्मेनियन अपोस्टोलिक चर्चने २५ डिसेंबर ऐवजी ६ जानेवारीला ख्रिसमस साजरा केला होता. मात्र, तज्ज्ञांच्या मते, ६ जानेवारीला एपिफेनी हा सण साजरा केला जातो आणि या सणाच्या निमित्ताने ख्रिसमस साजरा केला जातो.