कल्याणमध्ये विद्यार्थी रमले चित्र-रंगांच्या दुनियेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 10:47 AM2018-01-23T10:47:52+5:302018-01-23T10:51:39+5:30

कल्याण- डोंबिवली महानगरपालिका आणि पुसामा यांच्या संयुक्त विद्यमाने महापौर बालचित्रकार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं.

कल्याण डोंबिवली मनपा परिक्षेत्रातील 326 विविध शाळा मधील 5800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता दोन गटात ही चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती.

परिसर, पर्यावरण, स्वच्छता, निसर्ग असे विविध विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले.

कल्याणातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला ,ओक टॉव्हर व बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे चित्र काढलं.

पृथ्वीराज पांढरे या सरस्वती मंदिर शाळेत शिकणाऱ्या सहावीच्या विद्यार्थ्याने 6 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे काढलेले व्यंग चित्र सर्वाचे आकर्षण ठरलं.

कल्याणमधील काळा तलावमध्ये असलेल्या गोलाकार कडेला विद्यार्थी चित्रांच्या दुनियेत रमले होते.