QR कोडद्वारे पेमेंट्स करतेवेळी व्हा सावध! Scan करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 02:42 PM2022-01-28T14:42:32+5:302022-01-28T14:55:17+5:30

QR code : सध्या लोकांनी आपल्या खिशात रोख रक्कम ठेवणे बंद केले आहे, कारण ऑनलाइन पेमेंट खूप लोकप्रिय झाले आहे.

नवी दिल्ली : आजच्या डिजिटल जगात, आपली बहुतेक कामे ऑनलाइन होत आहेत. तसेच, सध्या लोकांनी आपल्या खिशात रोख रक्कम ठेवणे बंद केले आहे, कारण ऑनलाइन पेमेंट खूप लोकप्रिय झाले आहे.

Paytm आणि Google Pay सारख्या सर्व अॅप्ससह, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून फक्त QR कोड स्कॅन करून कुठेही पेमेंट करू शकता. पण तुम्हाला माहीत आहे का? अशाप्रकारे QR कोड स्कॅन करून तुम्ही पेमेंट करताना पैसे गमावू शकता? त्यामुळे तुम्ही QR कोड स्कॅन करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

QR कोड स्कॅन करून पेमेंट करताना, अनेकदा कोड्स तुम्हाला इतर वेबसाइटवर घेऊन जातात. या वेबसाइट्सवर काहीही करण्याआधी URL नक्की वाचा, कारण फसवणूक अशाच माध्यमांद्वारे केली जाते.

जर QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला कोणते अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंकवर नेले जात असल्यास, सावधगिरी बाळगा आणि अॅप स्टोअर किंवा Google Play Store व्यतिरिक्त कुठूनही अॅप डाउनलोड करू नका.

बर्‍याच वेळा हॅकर्स तुमच्या मेलमध्ये QR कोड देखील पाठवतात की, पेमेंट अयशस्वी झाले असेल तर ते येथून पूर्ण करा. अशा पद्धतीचे मेल्स टाळा आणि त्यामध्ये येणारे QR कोड स्कॅन करू नका.

तुम्ही कुठेही QR कोडने पेमेंट करत असल्यास, विशेषतः कॅफे किंवा रेस्टॉरंटमध्ये, लक्षात ठेवा की स्कॅन केल्यावर QR कोड तुम्हाला फक्त तुमच्या पेमेंट अॅपवर नेईल.

QR कोड कुठेही स्कॅन करण्यापूर्वी, तो एकदा तपासा कारण बऱ्याच वेळा हॅकर्स QR कोडवर एक पारदर्शक कागद लावतात. जे दिसून येत नाही. यामुळे तुमचे खूप आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.