मस्तच! आता मनपसंत इमोजी तयार करता येणार; Google चं भन्नाट फीचर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 05:08 PM2020-05-13T17:08:07+5:302020-05-13T17:25:22+5:30

भावना व्यक्त करण्याचं इमोजी हे अप्रतिम माध्यम आहे. युजर्सना त्यांच्या आवडीनुसार मनपसंत इमोजी तयार करता येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर संवाद साधताना इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

भावना व्यक्त करण्याचं इमोजी हे अप्रतिम माध्यम आहे.

गुगलने आपल्या युजर्ससाठी एक फीचर आणलं आहे.

नव्या फीचरच्या मदतीने युजर्सना त्यांच्या आवडीनुसार मनपसंत इमोजी तयार करता येणार आहे.

इमोजी किचन (Emoji Kitchen) असं या फीचरचं नाव आहे.

गुगल जीबोर्डसाठी हे फीचर रोलआऊट करण्यात आलं आहे.

इमोजी किचन फीचरच्या मदतीने आवडता इमोजी कस्टमाईज करता येणार आहे.

दोन इमोजी एकत्र करून आपल्या मर्जीप्रमाणे नवा इमोजी तयार करता येणार आहे.

गुगलने हे फीचर रोलआऊट केलं असून यासाठी गुगल प्ले स्टोरवर जाऊन गुगल जीबोर्ड अ‍ॅप अपडेट करणं गरजेचं आहे.