जिओचा पुन्हा धमाका! 5G ची ट्रायल घेणार; 4G सारखे पुन्हा मोफत देणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 04:40 PM2020-03-03T16:40:23+5:302020-03-03T16:49:35+5:30

जिओने देशात 4 जी आणून धमाका उडविला होता. सुरुवातीला मोफत, नंतर काही शे पैसे आकारून जो डेटा महिन्याला 500 रुपये मोजूनही मिळत नव्हता तो दिवसाला उपलब्ध केला.

मुकेश अंबानी यांनी नुकतेच चीनची मदत न घेता भारतात फाईव्ह जी लाँच करणार असल्याची घोषणा केली. महत्वाचे म्हणजे यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. यावेळी ट्रम्प यांनी त्यांचे अभिनंदनही केले. आता प्रतिक्षा संपली आहे. जिओ त्यांनी स्वत: बनविलेल्या 5 जी नेटवर्कची ट्रायल घेणार आहे.

जिओने देशात 4 जी आणून धमाका उडविला होता. सुरुवातीला मोफत, नंतर काही शे पैसे आकारून जो डेटा महिन्याला 500 रुपये मोजूनही मिळत नव्हता तो दिवसाला उपलब्ध केला.

यामुळे ग्राहकांच्या पटापट उड्या जिओच्या नेटवर्कवर पडल्या. यामुळे याआधी होणारी लूट थांबली. परंतू जिओचे नेटवर्क हळूहळू स्लो होऊ लागले.

आता जगभरात 5जीचे वारे वाहत आहेत. यामुळे जिओने 4जीपेक्षा कमालीचे वेगवान असलेले 5जी नेटवर्क सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे तंत्रज्ञान जिओने चीनची जराही मदत न करता विकसित केल्याचा दावा केला आहे. या 5जीचे टेस्टिंग घेण्यासाठी जिओने सरकारकडे परवानगी मागितली आहे.

जरी जिओने 5जी तंत्रज्ञान विकसित केलेले असले तरीही 5जी ची चाचणी यशस्वी झाल्यानंतर 5जी च्या उपकरणांची निर्मिती अन्य कंपन्यांकडे देण्यात येण्याची शक्यता आहे.

यासाठी सॅमसंग, हुवावे, नोकिया आणि एरिक्सन साऱख्या कंपन्या मदत करू शकतात. जिओची सध्याची 4जी उपकरणे सॅमसंग बनवत आहे. यामुळे कदाचित 5जी देखील सॅमसंगच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यात भारत दौऱ्यावर आलेल्या मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानींशी चर्चा केली. यावेळी अंबानी यांनी सांगितले की, भारतातील कोणताही छोटा उद्योजक पुढील काळात धीरुभाई अंबानी बनू शकतो.

जिओ भारतात आल्यामुळे इंटरनेट खूप स्वस्त झाले आहे. जिओ यायच्या आधी भारतात 1 जीबी डेटाची किंमत 300 ते 500 रुपये होती जी आता 12 ते 15 रुपये झाली आहे, असेही अंबानी म्हणाले होते.

देशातील प्रमुख कंपन्यांपैकी असलेल्या व्होडाफोन आणि एअरटेल या कंपन्या तोट्यात आहेत. यामुळे 5 जी स्पेक्ट्रम घेण्यासाठी या कंपन्या नाखूश आहेत.

अशात जिओने 5 जी नेटवर्क आणल्यास या कंपन्यांचे कंबरडेच मोडणार आहे. बीएसएनएलकडे सध्या 4 जी देखील नाहीय. आता जिओ 4 जी सारखी पहिले तीन महिने मोफत ट्रायल घेणार की स्वत:च वापरणार हे पहावे लागणार आहे.