हेल्थ आणि डाएटचं नो टेन्शन; मोबाईल Apps देतील इन्फॉर्मेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 12:05 IST2019-05-07T11:51:24+5:302019-05-07T12:05:55+5:30

कामाच्या धावपळीत आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही. मात्र आता या तंत्रज्ञानाच्या जगात स्वत: ची काळजी घेणं थोडं सोपं झालं आहे.
स्मार्ट हँडबँड आणि मोबाईल अॅप्सच्या मदतीने शरिराची काळजी घेता येते. हेल्थ आणि डाएटसाठी फायदेशीर असलेल्या अशाच काही अॅप्सबाबत जाणून घेऊया.
HealthifyMe
HealthifyMe हे एक बेस्ट डाएट अॅप आहे. यामध्ये कॅलरी काऊंट करून तुम्ही वजन कमी करण्याबाबत अथवा वाढवण्याचा निर्णय घेऊ शकता. तसेच तुम्ही खात असलेल्या पदार्थांमध्ये किती कॅलरीज आहेत याची देखील माहिती मिळणार आहे. तसेच healthy food ची माहिती दिली आहे.
Lifesum
Lifesum या अॅपमध्ये Keto diet, low carbs, high proteins यासारख्या सर्व गोष्टींची माहिती मिळते. तसेच Diet Plan, Diet tips आणि Calorie Count सह food tracker, health tracker ची माहिती मिळते.
MyFitnessPal
MyFitnessPal हे एक उत्तम अॅप असून 200 million पेक्षा जास्त लोक त्याचा वापर करत आहेत. Calorie Counter सह Nutrients देखील या अॅपमध्ये ट्रॅक करता येतात. तसेच water tracking चा देखील पर्याय आहे. या सोबतच Goal सेट करता येते.
YAZIO
YAZIO या अॅपच्या मदतीने रोजची Food Diary आणि प्रत्येक अॅक्टिव्हीटी ट्रॅक करता येते. Nutrition tracker आणि Nutritional Plans बाबत माहिती मिळते. तसेच या अॅपमध्ये 100 पेक्षा जास्त हेल्दी रेसिपीज देण्यात आल्या आहेत.
Runtastic
Runtastic हे हेल्थ आणि डाएटसाठी लोकप्रिय अॅप असून अनेकांनी ते डाऊनलोड केले आहे. Calorie चेक करण्यासाठी तसेच अॅक्टीव्हिटीज ट्रॅक करण्यासाठी या अॅपचा वापर केला जातो. Meal Planner च्या मदतीने निरोगी आरोग्य ठेवण्यास मदत होते.