1 सप्टेंबरपासून बदलणार हे 5 नियम; मोबाईल युजर्सवर होऊ शकतो मोठा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 05:50 PM2021-08-30T17:50:58+5:302021-08-30T18:06:04+5:30

1 सप्टेंबरपासून काही बदल लागू केले जाणार आहे, त्यांच्यामुळे स्मार्टफोन आणि टेक्नॉलॉजी युजर्सच्या खिशावर आणि वापरावर परिणाम होऊ शकतो. चला जाणून घेऊया 5 नियम जे 1 सप्टेंबरपासून बदलणार आहेत.

1 सप्टेंबर 2021 पासून डिज्नी+हॉटस्टार, ई-कॉमर्स साईट, गुगल प्ले स्टोर, Google Drive इत्यादी सुविधांचे नियम बदलण्यात येणार आहे. डिज्नी+हॉटस्टारचे महाग प्लॅन महाग होणार आहेत, तर ऑनलाईन शॉपिंग महागणार आहे.

गेल्यावर्षी झालेल्या लॉकडाउनमुळे ऑनलाईन शॉपिंगचे महत्व आणि वापर वाढला होता. आता यावर थोडा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीचा बोझा वाढू शकतो. 1 सप्टेंबरपासून ई-कॉमर्सवरून वस्तू ऑर्डर करणे महाग होऊ शकते. डीजल आणि पेट्रोलच्या किंमती वाढल्यामुळे लॉजिस्टिक्स कंपन्या आपले दर वाढवू शकतात. आता या कंपन्या 500 ग्रामच्या पॅकेजसाठी 58 रुपये आकारण्यास सुरुवात करणार आहेत. ही रक्कम ग्राहकांकडून मिळवण्यासाठी विक्रेते आपल्या सामानाची किंमत वाढवू शकतात.

पुढील महिन्यात आयपीएलचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. परंतु तत्पूर्वी 1 सप्टेंबरपासून OTT प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar चे सब्सक्रिप्शन महागणार आहे. आता युजर्सना बेस प्लॅनसाठी 399 रुपयांच्या ऐवजी 499 रुपये दयावे लागतील. थोडक्यात युजर्सना 100 रुपये जास्त द्यावे लागतील. तसेच, 899 रुपयांमध्ये दोन फोन्समध्ये Disney+ Hotstar एचडी क्वॉलिटीसह अ‍ॅप वापरता येईल. तसेच 4 डिव्हाइसेसवर या ओटीटी प्लॅटफॉर्मचा आनंद घेण्यासाठी 1,499 रुपये द्यावे लागतील.

सप्टेंबरमध्येच गुगल प्ले स्टोरवरील पर्सनल लोन अ‍ॅपसाठी नवीन नियम लागू होणार आहेत. कर्जाच्या नावावर फसवणूक करणाऱ्या किंवा कर्जदारांना त्रास देणाऱ्या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात येईल. हा नियम भारतात 15 सप्टेंबरपासून शॉर्ट टर्म पर्सनल लोन अ‍ॅप्सवर गुगल प्ले स्टोरकडून लागू केला जाईल.

1 सप्टेंबरपासून Google ची नवीन नियमावली लागू होणार आहे. याअंतर्गत खोट्या आणि फसव्या कंटेंटला प्रोत्साहन देणाऱ्या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात येईल. दीर्घकाळ निष्क्रिय अ‍ॅप्स देखील ब्लॉक करण्यात येतील.

13 सप्टेंबरला गुगल ड्राइव्हवर नवीन सिक्योरिटी अपडेट मिळणार आहे. याची माहिती गुगलने याआधीच दिली आहे. या अपडेटनंतर गुगल ड्राईव्हच्या सुरक्षेत वाढ होईल. याआधी ड्राईव्हच्या फाईल शेयरिंग अँड एडिटिंग फिचरमध्ये गुगलने बदल केले होते.

Read in English