या दुधवाल्याचा नादच खुळा! हार्ले डेविडसनवरुन विकतो दूध, स्वॅग बघून नेटकरी चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 03:17 PM2023-01-03T15:17:20+5:302023-01-03T15:27:37+5:30

आपल्याकडे रोज सकाळी दूध देण्यासाठी दुधवाला येत असतो. हा दुधवाला एकतर सायकल किंवा स्प्लेंडरसारख्या दुचाकीवरुन येतो. एखादे दुधवाले तर सायकलवरुनही येतात.

आपल्याकडे रोज सकाळी दूध देण्यासाठी दुधवाला येत असतो. हा दुधवाला एकतर सायकल किंवा स्प्लेंडरसारख्या दुचाकीवरुन येतो.

एखादे दुधवाले तर सायकलवरुनही येतात. पण, सध्या एक दुधवाला चांगलाच व्हायरल झाला आहे.

हा दुधावाला दूध टाकण्यासाठी चक्क 'हार्ले डेविडसन' या लाखो रुपयांच्या बाईकचा वापर करतो. या दुधवाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा दुधवाला रोज सकाळी लग्जरी बाईक हार्ले डेविडसनवरुन प्रत्येक ग्राहकाजवळ जातो. या बाईकच्या नंबरप्लेटवर 'गुर्जर' असं लिहिले आहे. या व्हिडिओत त्या बाईकच्या पाठिमागे दुधाचे दोन कंटेनर लावलेले आहेत.

अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत, सर्वसामान्य लोक एखादी बाईक घेण्यासाठी शंभरवेळा विचार करतात. पण, हा दुधवाला व्यक्ती चक्क लाखो रुपयांच्या बाईकचा वापर करत असल्याचे दिसत आहे.

या आलिशान दुचाकीला दोन मोठे कंटेनर बांधून हा माणूस दूध विकत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्राम वापरकर्त्याने 18 डिसेंबर रोजी पोस्ट केला आहे. आतापर्यंत 1 लाख 92 हजारांहून अधिक लाईक्स आणि 30 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

तसेच शेकडो युजर्सनी त्यावर कमेंट्स केल्या. एका नेटकऱ्याने'जेव्हा वडिलांनी हार्ले डेव्हिडसनला कौटुंबिक व्यवसायात सामील होण्याचे वचन दिले आहे, अशी कमेंट केली आहे.