PHOTOS : इंग्लिश समर! सूर्यकुमार आणि देविशाची भटकंती; कुटुंबीयांसोबत परदेशात रमले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 18:43 IST2024-08-20T18:37:02+5:302024-08-20T18:43:40+5:30
सूर्यकुमार जगातील नंबर वन ट्वेंटी-२० फलंदाजांपैकी एक आहे.

सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी हे दोघे कुटुंबीयांसह परदेशात आहेत. तिथे ते तेथील निसर्गाचा आनंद घेत आहेत. सूर्याची पत्नी देविशा शेट्टीने याची झलक शेअर केली आहे.
"इंग्लिश समर", अशा आशयाचे कॅप्शन देविशाने लिहिले. सूर्या आणि देविशाची लव्हस्टोरी फारच रंजक आहे.
भारतीय संघाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या संघाचा भाग होता. त्याने अंतिम सामन्यात मोक्याच्या क्षणी अप्रतिम झेल घेऊन भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला.
सूर्यकुमार जगातील नंबर वन ट्वेंटी-२० फलंदाजांपैकी एक आहे. सूर्यकुमार यादवने मागील मोठ्या कालावधीपासून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली.
सूर्या आणि देविशा यांची पहिली भेट २०१२ मध्ये मुंबईच्या पोद्दार डिग्री कॉलेजमध्ये झाली होती.
तेव्हा सूर्या B.Com च्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता आणि देवीशा बारावी पास होती. तेव्हा सूर्याचे वय २२ वर्षे तर देविशा १९ वर्षांची होती.
कॉलेजमध्ये असतानाच सूर्याला देविशाचा डान्स खूप आवडला आणि तो तिच्या प्रेमात पडला.
तर देविशा देखील सूर्याच्या फलंदाजीच्या शैलीमुळे प्रभावित झाली होती.
तेव्हापासून दोघांनी जवळपास पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१६ मध्ये लग्न केले.