पावसाचं पाणी करु नका वेस्ट; देशाचं संकट दूर करण्याचा 'हा' उपाय आहे बेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 11:34 AM2019-07-29T11:34:41+5:302019-07-29T11:37:50+5:30

भविष्यकाळात पाणी टंचाईचं संकट देशासमोर चिंतेचा विषय आहे. ही चिंता दूर करण्यासाठी पाणी वाचविण्याचे विविध संकल्पना अंमलात आणल्या जात आहेत. पाणी वाचविण्याचा सर्वात बेस्ट उपाय आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग. पावसाचं पाणी वाचवण्याने ते घराची साफ-सफाई, भांडी-कपडे धुणे अशा कामांसाठी वापर केला जाऊ शकतो.

रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. छोट्या स्तरावरही या संकल्पनेची सुरुवात केली जाऊ शकते. घराबाहेर मोठे पाण्याचे ड्रम्स ठेऊन पाण्याची साठा तयार केला जाऊ शकतो. हे ड्रम नेटच्या सहाय्याने बंद करा ज्यामुळे पाण्याच्या ठिकाणी मच्छर अथवा डास तयार होणार नाहीत.

घराच्या छतावरुन पडणारं पाणी वाचविण्यासाठी बाजारात पीवीसी पाईप सहज उपलब्ध होऊ शकतो. या पाईपच्या सहाय्याने पत्र्यावरुन पडणारं पाणी टाकीमध्ये गोळा केलं जाऊ शकतं.

रेन गार्डनच्या माध्यमातून पाणी वाचविण्याचा चांगला प्रयत्न केला जाऊ शकतो. बागेमध्ये चौहूबाजूने जमिनीची उंची वाढवून पाणी एका साच्यात साठून झाडांना हे पाणी मिळेल. त्यामुळे 1 आठवडा तुम्हाला झाडांना पाणी देण्याची गरज भासणार नाही.

रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाणी वाचविण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले तर पाण्याची बचत केली जाऊ शकते. आणि घरकामाला पावसाच्या पाण्याचा वापर होऊ शकतो.

टॅग्स :पाऊसRain