स्वामी ऑनलाइन जगाचा; लाखो कमावतो 'हा' भिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 02:56 PM2019-03-21T14:56:53+5:302019-03-21T15:01:30+5:30

न्यू यॉर्कमध्ये राहणारा जोवन हिल ट्विटरवर भीक मागून लाखो डॉलर्स कमावतो. 25 वर्षांच्या जोवनचे ट्विटरवर 1 लाख 10 हजार फॉलोअर्स आहेत.

जोवनचे ट्विट्स आणि त्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग अतिशय मजेदार असतं. ते पाहून त्याचे फॉलोअर्स त्याला पैसे देतात.

जोवन दर महिन्याला पाच लाख रुपये कमावतो. त्याची लाईफस्टाईल पाहून अनेकांना धक्का बसतो. जोवन त्याचे सर्व महागडे छंद ट्विटरवर भीक मागून पूर्ण करतो.

ऑनलाईन भीक मागण्याआधी जोवन एका रेस्टॉरंटमध्ये काम करायचा. तिथे त्याला दर महिन्याला साधारणत: 87 हजार रुपये मिळायचे.

मिश्किल स्वभावामुळे आपण यशस्वी झाल्याचे जोवन सांगतो. त्याची आई नर्स म्हणून, तर वडील आयटी क्षेत्रात काम करतात. फोर्ब्स मासिकाच्या प्रसिद्ध उद्योगपतींच्या यादीत आपला समावेश व्हावा, हे जोवनचं स्वप्न आहे.

नोकरी सोडून ट्विटरवर भीक मागून लाखो रुपये कमावणाऱ्या जोवनची सध्या सर्वत्र चर्चा आहे.