जगातील सर्वात लहान वयाची आई! ५ वर्षांची लीना मेदीना, नेमकं काय झालं होतं तिच्यासोबत..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 18:57 IST2025-11-26T15:17:53+5:302025-11-26T18:57:16+5:30

Lina Medina Story : प्रिकॉशियस प्यूबर्टी म्हणजेच लहान वयात लैंगिक परिपक्वता येणे या स्थितीमुळे इतक्या लहान वयात गर्भधारणा शक्य झाली.

World Youngest Mom: 1939 मध्ये पेरूमधील केवळ 5 वर्षांच्या लीना मेदीना हिने एका निरोगी मुलाला जन्म देऊन जगातील सर्वात कमी वयातील आई म्हणून इतिहास रचला. प्रिकॉशियस प्यूबर्टी म्हणजेच लहान वयात लैंगिक परिपक्वता येणे या स्थितीमुळे इतक्या लहान वयात गर्भधारणा शक्य झाली. हा प्रकरण आजही वैद्यकीय जगासाठी एक मोठं रहस्य आहे.

ज्या वयात मुलांना व्यवस्थित खेळायला देखील येत नाही, त्या वयात काही मुलींनी मूल जन्मास घातले आहे, हे ऐकून कुणालाही धक्का बसेल. पण ही सत्य घटना आहे.

1939 मध्ये लीना मेदीना या 5 वर्षांच्या मुलीने मुलाला जन्म दिला, असे इंडिया टुडेने नमूद केले आहे. तिच्या पोटाचा आकार वाढू लागल्यावर कुटुंबाला वाटले की तिला ट्यूमर झाला आहे. उपचारासाठी तिला पिस्को शहरातील डॉक्टरांकडे नेण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले की, ती 8 महिन्यांची गर्भवती आहे. हे ऐकून कुटुंब आणि डॉक्टर दोघेही थक्क झाले.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार लीनाला प्रिकॉशियस प्यूबर्टी ही दुर्मिळ समस्या होती. या स्थितीत मुलींमध्ये 8 वर्षांपूर्वी, मुलांमध्ये 9 वर्षांपूर्वी शारीरिक बदल सुरू होतात. शरीराचा आकार वाढणे, हार्मोन्स वाढणे आणि प्रजनन क्षमता लवकर विकसित होणे अशी लक्षणे दिसतात. दर 10,000 मुलांपैकी एखाद्यामध्ये ही स्थिती आढळते.

लीनाचं वय आणि तिची शारीरिक रचना नॉर्मल डिलिव्हरीसाठी योग्य नव्हती, त्यामुळे डॉक्टरांनी सी-सेक्शनद्वारे प्रसूती केली. मुलाच्या पित्याची ओळख आजतागायत समोर आलेली नाही. काही लोकांनी हा प्रकार खोटा ठरवण्याचा प्रयत्न केला, पण डॉक्टर्सच्या रिपोर्ट्स, एक्स-रे आणि फोटोंनी हे प्रकरण सत्य असल्याचे सिद्ध केले.

लीना एकटीच नव्हती. इतर ठिकाणीदेखील असे प्रकार घडले. सोव्हिएत संघ (रशिया) मध्ये ६ वर्षांची येलिझावेता लिझा ग्रिशचेंको हिने मुलाला जन्म दिला, परंतु तो जिवंत राहिला नाही.

नायजेरिया – मम-झी नावाच्या मुलीने 8 वर्षे 4 महिन्यांच्या वयात मूल जन्माला घातले. तिच्या मुलाने सुद्धा खूप लहान वयात बाळाला जन्म दिला आणि ती जगातील सर्वात कमी वयातील आजी ठरली.

लीनाने नंतर पूर्णपणे साधे आणि शांत आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. प्रसिद्धीपासून दूर राहिली, मुलाला प्रेमाने वाढवले आणि मोठमोठे ऑफरही नाकारले. तिची कथा आजही डॉक्टर आणि संशोधकांसाठी एक अधिकृत रहस्य आहे.