स्वयंपाकघरातील ४ गोष्टी ठरतील 'स्लीपिंग पिल्स'पेक्षाही भारी, लागेल शांत झोप आणि वाटेल फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2026 19:05 IST2026-01-08T19:01:00+5:302026-01-08T19:05:01+5:30

natural sleep remedies: insomnia home remedies: foods for better sleep: शांत झोप येण्यासाठी आहारात कोणते पदार्थ खायला हवे पाहूया.

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत कामाचा ताण, जंकफूड, कॅफिनचे सेवन आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे निद्रानाशच्या समस्येला सामोरे जावे लागते. अनेक लोक तासंतास डोळे उघडे ठेवून छताकडे पाहत बसतात.पण तरीही झोप काही लागत नाही. शेवटी कंटाळून झोपेच्या गोळ्या घेतात, ज्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. (natural sleep remedies)

आपल्या स्वयंपाकघरात असे काही पदार्थ आहेत जे आपल्याला औषधांशिवाय गाढ आणि शांत झोप येण्यास मदत करतात. त्यासाठी आहारात कोणते पदार्थ खायला हवे पाहूया. (insomnia home remedies)

रात्री झोपण्यापूर्वी आपण कोमट दुधात चिमूटभर जायफळ पूड टाकून प्या. जायफळमध्ये नैसर्गिक घटक असतात ज्यामुळे आपल्याला काही क्षणात झोप येऊ लागते.

केळी हे शरीराला ऊर्जा देत नाही तर उत्तम झोप मिळवून देण्यासाठीही ओळखले जाते. केळीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्यासाठी आहारात केळी खायला हवी.

बदाम हे मॅग्नेशियमचा उत्तम स्त्रोत मानला जातो. शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असल्यास झोपेची समस्या येते. बदाम खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर होऊन झोप सुधारते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ४ ते ५ भिजवलेले बदाम खा.

खसखस दुधात घालून त्याची खीर खाल्ल्यास निद्रानाशाची समस्या कमी होते आणि शांत झोप लागण्यास मदत होते.

शांत आणि गाढ झोप येण्यासाठी आपण स्क्रीन टाइम कमी करायला हवा. झोपण्यापूर्वी किमान १ तास मोबाईल किंवा लॅपटॉप बाजूला ठेवा. खोलीत अंधार ठेवा, ज्यामुळे शांत झोप लागे.