पित्ताचा त्रास होतो? रोजच्या आहारातील हे पदार्थ जरा जपूनच खा , पित्त वाढवतात आणि ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2025 18:21 IST2025-12-01T18:16:11+5:302025-12-01T18:21:00+5:30

Do you have acidity problem? Eat these foods in your daily diet with caution, they increase problems : पित्ताचा त्रास होत असेल तर पाहा काय करायला हवे. आहारात करा बदल.

आपल्या आहारात असे काही पदार्थ असतात जे पित्तकारक असतात. त्यामुळे हे पदार्थ जास्त खाणे आरोग्यासाठी चांगले ठरत नाही. त्यातील काही घटक पित्त प्रवृत्ती असणाऱ्यासाठी वाईट ठरतात.

जसे की वाल - पावटा. हे पदार्थ गॅसेस वाढवतात. तसेच पित्तही वाढवतात. त्यामुळे पावटा खाताना काळजी घ्यायला हवी. पाणीही जास्त प्यायचे.

नारळ हा पदार्थ आहारात असायलाच हवा. मात्र जर पित्ताचा त्रास असेल तर फोडणीत नारळ घालणे टाळा. त्यामुळे पित्त वाढतं आणि उलट्याही होतात. त्यामुळे नारळ प्रमाणातच खावा.

मेथी मुळात गरम असते. गरम पदार्थ शक्यतो पित्तकर असतात. त्यामुळे मेथी खाताना नुसती खात नाहीत सोबत काहीतरी असते ज्यामुळे पित्त आटोक्यात राहील. मेथी फार पौष्टिक असते, फक्त प्रमाणात खावी.

तसेच भरपूर पोषण असले म्हणजे पदार्थ पित्तकारक नाही असे होत नाही. त्यामुळे उडदाची डाळ कितीही पोषण देणारी असली तरी त्यामुळे पित्त वाढते.

मसूर डाळीमुळे पित्त वाढते. जास्त नाही पण ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे जेवणात मसूर असले ती तूप, दूध, ताक असे पदार्थ असायला हवेत.

टोमॅटो अति खाल्यामुळेही पित्त वाढू शकते. तसा टोमॅटो जास्त त्रासदायक नसला तरी तो अॅसिडिक असतो. त्यामुळे जास्त परतून खाल्यावर तसेच जास्त खाल्यावर पित्त वाढू शकते.