चाळिशीत तब्येत सुटली-नितंब आणि मांड्याही जाडजूड? ७ सोप्या सवयी, परत येईल सुडौल तारुण्य...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2025 16:23 IST2025-07-09T16:01:51+5:302025-07-09T16:23:49+5:30
7 lifestyle & Diet Tips To Manage Hip & Thigh Fat In 40s : 7 easy ways to reduce thigh fat : How to Reduce Thigh Fat After 40 : How to reduce hip fat : 7 lifestyle tips for a toned butt : चाळिशीनंतर विशेषतः महिलांमध्ये कंबरेखालचा भाग, मांड्या, नितंब याठिकाणी चरबी साचू लागते, यासाठी बेस्ट उपाय...

वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर शरीरात अनेक हार्मोनल बदल (7 lifestyle & Diet Tips To Manage Hip & Thigh Fat In 40s) सतत होत असतात. ज्याचा थेट परिणाम महिलांच्या शरीरयष्टीवर होतो. विशेषतः कंबरेखालचा भाग, मांड्या आणि नितंब याठिकाणी चरबी साचू लागते आणि शरीराचा आकार बिघडतो. हे फक्त सौंदर्यदृष्टीने नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही चिंतेचं कारण ठरू शकतं.
असे असले तरी योग्य आहार, एक्सरसाइज (How to Reduce Thigh Fat After 40) आणि काही चांगल्या सवयी वेळीच (7 lifestyle tips for a toned butt) स्वतःला लावून घेतल्या तर या भागाची वाढ थांबवता येऊ शकते. काही सोप्या घरगुती उपायांमुळे वयाच्या चाळिशीतही शरीर पुन्हा टोन्डमध्ये आणता येतं. अशाच ७ सोप्या आणि उपयुक्त टिप्स, ज्या चाळिशी नंतरही महिलांना स्वतःला फिट आणि शेपमध्ये ठेवण्यास मदत करतील.
दिल्ली विद्यापीठातून न्यूट्रिशनमध्ये मास्टर्स केलेल्या हार्मोन व गट हेल्थ कोच म्हणून कार्यरत असलेल्या डाएटिशियन मनप्रीत यांनी त्यांच्या इंस्टाग्राम व्हिडिओवरुन याबद्दल अधिक माहिती शेअर केली आहे.
१. सकाळी उपाशीपोटी धणे व मेथी दाण्यांचे पाणी प्या. यामुळे शरीरातील ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. याचबरोबर मांड्या व नितंबाभोवती साचलेली चरबी कमी होण्यास मदत होते. ही एक सोपी पण फायदेशीर अशी नैसर्गिक पद्धत आहे जी खास करून चाळिशीनंतर महिलांसाठी फायदेशीर ठरू शकते.
२. कडीपत्ता आणि मोहरीची फोडणी दिलेलं सॅलॅड खा. यामुळे पचनक्रिया सुधारते, इन्सुलिनची पातळी संतुलित राहते आणि शरीरात चरबी साचण्याची प्रक्रिया कमी होते. हा उपाय सॅलॅड चवीला तर खास करतोच सोबतच आरोग्यालाही फायदेशीर ठरतो.
३. आठवड्यातून ३ वेळा ३० ते ४० मिनिटे ब्रिस्क वॉकिंग किंवा रेझिस्टन्स ट्रेनिंगचा सराव करा. यामुळे शरीरातील पेशींमध्ये ग्लुकोज शोषणाची क्षमता वाढते आणि चरबी कमी होण्यास मदत होते. ही सवय वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि संपूर्ण शरीर टोन्डमध्ये आणण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
४. डाएटमध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले कार्ब्स जसे की बाजरी, ज्वारी, नाचणी यांसारखी भरडधान्य आणि ओट्स यांचा समावेश करा. यामुळे इन्सुलिनची पातळी अचानक वाढत नाही आणि त्यामुळे शरीरात चरबी साठण्याची प्रक्रिया हळूहळू कमी होते. हे पदार्थ शरीराला ऊर्जा देतात आणि पचनासाठीही चांगले असतात.
५. डाएटमध्ये बदाम, अक्रोड आणि भोपळ्याच्या बियांसारखे नट्स आणि सीड्स समाविष्ट करा. या पदार्थांमध्ये हेल्दी फॅट्स असतात आणि यामुळे हे पदार्थ शरीराला आवश्यक पोषण देऊन चरबी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
६. डाएटमध्ये लिव्हर निरोगी ठेवणारे पदार्थ जसे की बीटरुट आणि आवळा यांचा समावेश करावा. यामुळे एस्ट्रोजेन डिटॉक्स होतो आणि त्यामुळे फॅटलॉस होण्यास मदत होते. हे पदार्थ लिव्हरचं कार्य सुधारतात आणि शरीरातील हार्मोन्सचा समतोल राखण्यात मदत करतात.
७. मांड्या आणि कंबरेच्या भागाची हलक्या हाताने तेल लावून मालिश करावी. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात आणि साचलेली चरबी कमी होण्यास मदत होते. नियमित मालिश केल्याने रक्त प्रवाह सुधारतो आणि त्वचा अधिक घट्ट आणि टोन्ड झालेली दिसते.