काहीही केलं तरी वजन कमीच होत नाही? मग 'हा' घ्या स्मार्ट मार्ग; २१-२१-२१ नियम सर्वात बेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 16:01 IST2025-07-09T15:47:46+5:302025-07-09T16:01:12+5:30

वजन कमी करण्याचा स्मार्ट मार्ग समोर आला आहे.

वजन वाढण्याची समस्या सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येत आहे. यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. डायबेटिस, हाय ब्लड प्रेशर, मेटाबॉलिज्म किंवा कॅन्सरसारखे गंभीर आजार असो, जास्त वजन हे या सर्वांचं एक प्रमुख कारण मानलं जातं. अशा परिस्थितीत वजन कमी करण्याचा स्मार्ट मार्ग समोर आला आहे.

एका मुलाखतीदरम्यान फिटनेस एक्सपर्ट योगेश भटेजा यांनी वजन कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग सांगितला आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे वजन कमी करू शकता. फिटनेस एक्सपर्ट म्हणाले की, जेव्हा लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा बहुतेक लोक जिम, व्यायाम, डाएटवर लक्ष केंद्रित करतात.

एका मुलाखतीदरम्यान फिटनेस एक्सपर्ट योगेश भटेजा यांनी वजन कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग सांगितला आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे वजन कमी करू शकता. फिटनेस एक्सपर्ट म्हणाले की, जेव्हा लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा बहुतेक लोक जिम, व्यायाम, डाएटवर लक्ष केंद्रित करतात.

जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर २१-२१-२१ हा नियम एक प्रभावी मार्ग असू शकतो ज्याच्या मदतीने तुम्ही काही दिवसांत सहज वजन कमी करू शकता. यासाठी काय करावं ते समजून घ्या...

वजन कमी करण्यास सुरुवात केल्यापासून पहिल्या २१ दिवसांसाठी शारीरिक हालचालींवर लक्ष केंद्रित करा. शरीराला एक्टिव्ह ठेवणाऱ्या व्यायामांवर लक्ष केंद्रित करा जसं की स्ट्रेचिंग, हलका व्यायाम, चालणे-धावणे. २१ दिवस दररोज न चुकता व्यायाम करा.

तुमच्या आहाराची काळजी घ्या. म्हणजेच २१ व्या ते ४२ व्या दिवसापर्यंत, कार्बोहायड्रेट आणि कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन कमीत कमी करा. आहारात बदल हा वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे. सकस आहाराची, योग्य वेळी खाण्याची सवय लावा. अशा बदलांच्या मदतीने तुम्हाला लवकर वजन कमी करता येतं.

जर तुम्हाला अल्कोहोल, धूम्रपान किंवा कॉफीसारखे कोणतेही व्यसन असेल तर त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. हे एकून ६३ दिवस तुम्हाला जास्त प्रयत्न न करता तुमच्या आरोग्यात विशेष बदल घडवून आणण्यास मदत करतील.

२१ दिवसांच्या प्रत्येक सेटमध्ये तुम्हाला फक्त काही गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं लागेल. पहिले २१ दिवस शारीरिक हालचाल, नंतर पुढील २१ दिवसांच्या खाण्याच्या सवयी आणि त्यानंतर व्यसनात बदल करून तुम्ही सहजपणे वजन कमी करू शकता.

२१-२१-२१ हा रुल जादू नाही, परंतु तो तुमच्या सवयींमध्ये हळूहळू बदल आणतो, जो लवकर वजन कमी करण्यास मदत करू शकतो. त्यासाठी कोणत्याही डाएट प्लॅन किंवा खूप व्यायामाची आवश्यकता नाही, फक्त सातत्य राखल्यास तुम्ही सहजपणे वजन कमी करू शकता.