आठवड्याचे राशीभविष्य : 7 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 2021, "या" राशीची समाजात प्रतिष्ठा वाढणार, नोकरीत प्रगती होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 08:49 AM2021-02-08T08:49:12+5:302021-02-08T09:14:23+5:30

Weekly Horoscope 7 February to 13 February 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

हा आठवडा आपल्यासाठी चांगला असला तरी आठवड्याची सुरुवात मध्यम फले देण्याने होणार आहे. आपल्या कामांचा खोळंबा होऊ नये म्हणून कोणत्याही प्रकारे मानसिक तणावा पासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. आपणास नशिबाची साथ मिळू शकेल. आपल्या प्रियव्यक्तीस आपण वेळ देऊ शकत नसल्याची तक्रार राहील, तेव्हा तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या वडीलधाऱ्यांना आपल्या आधाराची गरज भासण्याची शक्यता असल्याने त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. नोकरीत नवीन लोकांसह काम करण्याची संधी मिळेल. व्यापारीवर्गास काही नवीन ऑर्डर्स मिळाल्याने त्यांचा उत्साह द्विगुणित होईल. विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करण्याची संधी मिळेल. तेथे खूप काही शिकावयास मिळाल्याचा फायदा शिक्षणात होईल. आपल्या प्रकृतीत मात्र सतत चढ - उताराची शक्यता असल्याने त्याची काळजी घ्यावी.

आठवड्यात आपण एका विशिष्ट उंचीवर जाऊन बसाल. आठवड्यात आपला जोडीदार काही कारणाने तणावग्रस्त नसल्याची खातरजमा करून घेण्यासाठी आपणास आपल्या वैवाहिक जीवनाकडे थोडे डोकावून बघावे लागेल. जोडीदारास समजून घेऊन त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आठवड्यात आपणास तीर्थयात्रेची संधी मिळेल. प्रणयी जीवनातील समस्या संपुष्टात येतील. व्यावहारिक दृष्ट्या आपण कोणाची काळजी करणार नाहीत, परंतु कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने आपण काहीसे चिंतीत होण्याची शक्यता आहे. नोकरीत आपले विरोधक आपल्या विरुद्ध कट - कारस्थान रचण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा सावध राहावे. व्यापारीवर्गास परिश्रम वाढवावे लागतील, तरच यश प्राप्ती होऊ शकेल. आपल्या प्रकृतीत सतत चढ - उतार येतील. काही लहान - सहान समस्या आपणास त्रास देतील.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्यात आपले आरोग्य व आर्थिक स्थिती नाजूक होण्याची शक्यता असल्याने आपणास ह्या दोघांची काळजी घ्यावी लागेल. वायफळ खर्च व आर्थिक नुकसान ह्यामुळे आपण त्रस्त होऊ शकता. भावंडांकडून काही अंशी आर्थिक मदत होऊ शकते. शारीरिक तंदुरुस्तीसाठी भोजन व व्यायाम याकडे लक्ष द्यावे. कुटुंबात काही तणाव निर्माण होऊ शकतो. प्रेमीजनांना आपल्या प्रियव्यक्तीशी संपर्क साधण्याची संधी मिळाल्याने नाते दृढ होण्यास मदत होईल. विवाहितांना मात्र, आपल्या जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. हा आठवडा प्रवासासाठी अनुकूल नसल्याने शक्यतो प्रवास टाळावेत.

आठवड्याच्या सुरुवातीसह जीवन व संबंध यांच्याप्रति आपल्या दृष्टिकोनात बदल होण्याची शक्यता आहे. दरम्यान वैवाहिक जीवनातील असमाधान व तणाव ह्यामुळे आपण त्रस्त होण्याची शक्यता आहे. एखाद्या जागरूक व्यक्ती प्रमाणे आपला अहंकार बाजूस सारून आपल्या जोडीदाराच्या नजरेतून वस्तुस्थिती समजण्याचा प्रयत्न करावा. आपण अशा प्रकारे केलेले सकारात्मक प्रयत्न वैवाहिक जीवनातील हरवलेली गोडी पुनर्स्थापित करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकेल. आठवड्याच्या सुरुवातीस नातेसंबंधाकडे आपला विशेष कल असेल असे असले तरी आठवड्याच्या मध्यास थोडा वेळ एकांतात घालविण्यास आपले प्राधान्य असेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा सामान्यच राहणार आहे. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमास पर्याय नसेल. ज्या विषयांचे अध्ययन पूर्ण झाले नसेल अशा विषयांवर अधिक लक्ष द्यावे लागेल. आठवड्यात आरोग्य चांगले राहणार असले तरी अचानकपणे एखादी दुखापत किंवा दुर्घटना होण्याची शक्यता आहे. आठवड्यात त्वचा विकार व पोटाचे विकार बळावण्याची शक्यता आहे. आरोग्य टिकविण्यासाठी नियमितपणे पौष्टिक भोजन व आवश्यक तितकी विश्रांती घ्यावी.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. विद्यार्थ्यांचे अध्ययन उत्तम झाल्याने त्यांना चांगला परिणाम मिळेल. संतती संबंधित जवाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. वैवाहिक जीवनात काही गुंता संभवतो. अशा परिस्थितीत धीर धरावा. प्रेमीजनांसाठी आठवड्याची सुरवात चांगली झाली तरी मधल्या दिवसात काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कष्टांचे यथोचित फळ मिळेल. व्यापारी वर्गास मात्र हा आठवडा काहीसा नाजूकच आहे. आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता असल्याने त्याची योग्य ती काळजी घ्यावी. मातुल वर्गाकडून काही त्रास संभवतो. विरोधकांच्या कारवाया वाढतील. एखादा मोठा आजार होऊ नये म्हणून आठवड्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. हा आठवडा प्रवासासाठी विशेष अनुकूल नाही.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपण कुटुंबियांना आवश्यक तितका वेळ देऊ शकाल. मातेशी संबंध सुधारतील. मातेची सेवा करण्याची आपली इच्छा पूर्ण झाल्याने आपणास मनःशांती लाभेल. आपण आपल्या कुटुंबियांच्या सुखाचा विचार कराल. कौटुंबिक जीवनात आनंद पसरेल. जोडीदाराचे आपणास उत्तम सहकार्य मिळेल. प्रेमीजनांना मात्र आठवड्यात काही समस्यांना सामोरे जावे लागेल. ह्या दरम्यान कदाचित आपल्या मनात प्रियव्यक्तीच्या ऐवजी इतर व्यक्ती स्थानापन्न झालेली असेल. अशा परिस्थिती पासून दूर राहिल्यासच आपले प्रणयी जीवन आनंदी होऊ शकेल. ह्या आठवड्यात आपले आरोग्य काहीसे नाजूक राहील. आपणास त्याकडे लक्ष द्यावे लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांच्या समस्या वाढतील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाराज होतील. आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा खूप मोठा फायदा मिळवून देणारा आहे. व्यापारात गुंतवणूक करणे आपल्या फायद्याचे होऊन त्यामुळे आपला नफा वाढत असल्याचे दिसून येईल. प्रवासासाठी हा आठवडा विशेष अनुकूल नाही.

हा आठवडा आपल्यासाठी आशादायी आहे. कौटुंबिक जीवनात आपल्या समोर अनेक आव्हाने येतील, मात्र आपण बिलकुल न डगमगता त्यांना सामोरे जाऊन त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीची प्रकृती ढासळू शकते. तसेच संपत्ती विषयक काही वाद निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीला कसे सामोरे जावे हे आपणास शिकावे लागेल. कुटुंबात एखादा समारंभ सुद्धा आयोजित होऊ शकतो, ज्यात अनेक अतिथी समाविष्ट असतील. जोडीदार गृहकार्यात अति व्यस्त राहिल्याने विवाहितांच्या वैवाहिक जीवनात निरसता पसरेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. त्यांना आपले प्रेमी जीवन आनंदित ठेवण्याची संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी आपल्या परिश्रमाचे चीज होईल. व्यापारात स्पर्धा वाढेल. भागीदारीत मात्र फायदा होईल. आपली प्रकृती चांगली राहिली तरी कंबरदुखीचा त्रास संभवतो. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपण स्वतःकडे अधिक लक्ष देऊन परिश्रमाने प्रगती साधाल. असे असले तरी मनात पूजा - पाठ करण्याची इच्छा झाल्याने धार्मिक कामे सुद्धा कराल. आठवड्याच्या मधल्या दिवसात कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालविण्यास आपण प्राधान्य द्याल. आठवडा अखेरीस आपल्या मित्रांसह मौज - मजा करण्यासाठी दूरवरच्या प्रवासास जाऊ शकाल. नोकरीच्या ठिकाणी आपली कामगिरी सामान्यच होईल. आपल्या सहकाऱ्यांच्या वागणुकीमुळे आपले मन दुखावू शकते. सहकारी आपणास त्रास देण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा चांगला आहे. त्यांना चांगले परिणाम मिळतील. आपले आरोग्य सामान्यच राहील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपले प्रणयी संबंध अधिक दृढ होतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. जोडीदारामुळे खूप मोठा फायदा होईल. तसेच जोडीदारासह एखाद्या दूरवरच्या प्रवासास जाऊ शकाल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्यात आपल्या खर्चात वाढ होणार असल्याने आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आपणास त्याला नियंत्रित ठेवावे लागेल. असे असले तरी जस जसे दिवस पुढे जातील तस तशी आपल्या स्थितीत सुधारणा होऊ लागेल. आपण धार्मिक कार्यात सहभागी होऊन त्यावर सढळहस्ते खर्च कराल. आपले आरोग्य चांगले राहिले तरी आहारातील असमतोलपणामुळे एखादी समस्या निर्माण होऊ शकते. नोकरीत आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. व्यापारात अधिक तत्पर राहावे लागेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्यच आहे. विवाहितांना कौटुंबिक जवाबदाऱ्या पार पाडण्यासाठी वेळ द्यावा लागेल. आपणास व जोडीदारास स्वतःसाठी वेळ मिळू शकणार नाही. आपल्या प्रकृतीत चढ - उतार येतील. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच प्राप्तीत वाढ होऊ लागेल. आपणास एखादा मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारास गती येईल. नोकरीत आपल्या कामाचे चांगले परिणाम मिळतील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील व त्यामुळे आपले संबंध दृढ होतील. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. आपली प्रतिमा उज्ज्वल होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्या दोघांपैकी एकाची प्रकृती बिघडू शकते. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या प्रियव्यक्तीस प्रेमाचा अर्थ समजल्याने ती आपणास खुश ठेवू शकेल. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपण आपल्या कामावर अधिक लक्ष दिल्याने कुटुंबास कमी वेळ देऊ शकाल. काम व कुटुंब ह्यात समतोल साधताना आपली तारांबळ होईल व त्यावर मात केल्यास ती आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रकृतीत चढ - उतार येतील. प्रकृती अधिक खराब होऊ नये म्हणून आपणास अधिक जागुरक राहावे लागेल. खर्चात अचानकपणे वाढ होईल, व त्यामानाने प्राप्तीत वाढ न झाल्याने आपणास काहीसे त्रस्त होण्याची शक्यता आहे. मानसिक चिंता वाढतील. पाय दुखी किंवा डोळ्यांची जळजळ होण्याची शक्यता आहे. विवाहितांचे जीवन चिंताग्रस्त राहील, मात्र आपला समजूतदारपणा येथे कामास येईल. प्रेमीजनांना धीराने काम करावे लागेल. आपल्या प्रियव्यक्तीचे हृदय जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपणास नशिबाची साथ मिळाल्याने जीवनातील विविध क्षेत्रात आपली कामगिरी उत्तम होऊ शकेल. आरोग्यात उल्लेखनीय सुधारणा होईल. आपल्या प्राप्तीत सुद्धा भरघोस वाढ संभवते. आपणास विविध मार्गाने पैसा मिळेल. जेथे आपला पैसा अडकला असेल तेथून सुद्धा पैसा येण्याची शक्यता आहे. आपल्या योजना फलद्रुप झाल्याने व्यापारास गती येईल. ह्या आठवड्यात व्यापारात चांगला फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा वरिष्ठांना प्रभावित करणे सहज शक्य होईल. आपली पत वाढू शकते. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. आपल्या फायद्यात जोडीदाराची प्रमुख भूमिका असेल. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. आपल्या प्रणयी जीवनास नवीन दिशा सापडेल. आठवड्यात आपल्या काही नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.