आठवड्याचे राशीभविष्य : 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2021; 'या' राशीसाठी आठवडा असणार आव्हानात्मक, राहा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 10:07 AM2021-11-16T10:07:00+5:302021-11-16T10:10:01+5:30

Weekly Horoscope 14 November to 20 November 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

हा आठवडा आपल्या अपेक्षापूर्तींचा आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपणास दूरवरच्या ठिकाणी प्रवासास जाण्याची सूचना मिळू शकते. आपण जर परदेशी जाण्यासाठी प्रयत्न केला असेल तर आपणास त्या संबंधीची एखादी चांगली बातमी मिळू शकेल. आपल्या विशेष योगदानामुळे व्यापारी क्षेत्रा कडून आपणास एखादा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी आपल्या कष्टांची प्रशंसा झाल्याने आपणास आनंद होईल. तसेच ह्या कष्टांचे चीज होऊन नोकरीत आपली स्थिती मजबूत होईल. आपले आरोग्य निरोगी राहून समस्या संपुष्टात येतील. वैवाहिक जीवनातील तणाव निवळू लागेल. ह्या आठवड्यात आपणास वैवाहिक जीवनात काही चांगले परिणाम सुद्धा मिळतील. आपल्या प्रिय व्यक्तीस विवाहासाठी तयार करणे आपणास सोपे जाईल, परंतु आपलीच एखादी व्यक्ती त्यात अडथळा निर्माण करण्याची शक्यता असल्याने ह्या विषयी इतरांना माहिती देऊ नये. आठवड्याचा उत्तरार्ध प्रवासासाठी अनुकूल आहे.

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आपण नवनवीन कामे हाती घ्याल. ह्या कामात यश प्राप्तीची संभावना सुद्धा अधिक आहे. आपला मानसिक ताण सुद्धा कमी होईल. आपण आव्हानांचा सामना करू शकाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहिले तरी एखाद्या संपत्ती वरून वाद होण्याची शक्यता आहे. प्रणयी जीवन सामान्यच राहील. आपल्या सर्जनात्मकतेने आपण आपल्या प्रिय व्यक्तीस खुश ठेवाल. विवाहितांना वैवाहिक जीवनात काही समस्यांचा सामना करावा लागेल. व्यापाऱ्यांना नवीन योजनांवर कार्यरत राहिल्यास व्यापारात प्रगती साधता येईल, अन्यथा ह्या आठवड्यात त्यांना आव्हानांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा खूपच चांगला असला तरी आपला गप्पिष्ट स्वभाव आपणास त्रासदायी होऊ शकतो. तेव्हा सावध राहून आपली कामे करावीत व इतर गोष्टीत विनाकारण आपला वेळ दवडू नये. कोणालाही आपली नकारात्मक बाजू दाखवू नका.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपण आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास आपणास काही चांगला लाभ होऊ शकतो. आठवड्याच्या सुरवातीस खर्चात वाढ झाल्याने आपण त्रस्त व्हाल. ह्या आठवड्यात आपल्या प्राप्तीपेक्षा खर्चात वाढ होणार असल्याने आपणास विचारपूर्वक आर्थिक नियोजन करावे लागेल. आपले आरोग्य बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे. अति चिंता करून आपणास मानसिक थकवा जाणवेल. ह्या स्थितीचा आपल्या कामावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात प्रेमाचा वर्षाव झाला तरी आपण आपल्या वागणुकीमुळे काही समस्या निर्माण कराल. प्रेमीजनांना तणावातून मुक्ती मिळाल्याने त्यांच्या स्थितीत सुधारणा होऊ लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा चांगला आहे. मात्र, आपणास लक्षपूर्वक आपली कामे करावी लागतील. आपली स्थिती मजबूत होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला असला तरी आर्थिक गुंतवणूक करण्यास अनुकूल नसल्याने थोडे दिवस थांबावे. आठवड्याचा उत्तरार्ध प्रवासासाठी अनुकूल आहे.

आठवड्याच्या सुरवातीस आपण आपले नाते संबंध अधिक दृढ करण्या बरोबरच त्यास उद्देश्यपुर्ण बनविण्यासाठी प्रयत्न कराल. ह्या दरम्यान आपल्यासाठी इतर गोष्टींपेक्षा भावनात्मक सुरक्षा अधिक महत्वाची राहील. आपले जर कोणाशी नाते जुळले नसेल तर एखाद्या व्यक्ती प्रति आपण भावनात्मक दृष्ट्या ओढले जात असल्याचे आपणास जाणवेल. विवाहेच्छुकांचा विवाह ठरण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यास आपल्या कामाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करावा. ह्या दरम्यान आपणास आरोग्य विषयक समस्यांचा सामना करावा लागल्याने आपणास सुस्ती जाणवेल. ह्या दरम्यान आपल्यातील आळस आरोग्य विषयक समस्या वाढविण्याचे कार्य करेल. व्यावसायिक आघाडीवर आपण विस्तार व विकासासाठी सक्रिय राहाल. आठवड्याच्या अखेरीस यश प्राप्त झाल्याने आपला आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. आपण व्यापार वाढीसाठी काही नवीन योजनांवर काम करू शकाल. आठवड्याच्या सुरवाती पासूनच विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागले तरी उत्तरार्धात नियोजनबद्ध अभ्यास केल्यास अधिक चांगले परिणाम प्राप्त होऊ शकतील.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या व्यापारावर अधिक लक्ष केंद्रित केलेत तरी आठवड्याच्या मध्यास काही समस्याने आपण त्रस्त होण्याची शक्यता आहे. असे असले तरी आठवड्याचा उत्तरार्ध खूपच चांगला राहील. आपणास नशिबाची साथ मिळाल्याने आपली कामे होतील. शासन व प्रशासनाचे सहकार्य मिळाल्याने आपणास चांगले यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना ह्या दरम्यान काही करून दाखवावे लागेल. आपल्या कष्टांची पराकाष्ठा करून कामे पूर्ण करावीत. व्यापारात लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. मित्रांचा सहवास संभवतो. प्रणयी जीवन आनंदमय राहील. आपसातील संबंध वृद्धिंगत होतील. खर्चात सुद्धा वाढ होईल. विरोधकांप्रती चिंतीत राहिलात तरी सुद्धा त्यांच्यावर मात करू शकाल. राजकारणाशी संबंधित व्यक्तींना चांगले परिणाम मिळतील.

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपण आपल्या ऊर्जेचा वापर योग्य दिशेने केल्यासच आपणास यश प्राप्त होऊ शकेल. आपणास शासनाकडून काही लाभ होण्याची शक्यता आहे. काहीजणांना विम्याचे पैसे सुद्धा मिळू शकतात. वैवाहिक जीवन आनंदमय राहील. प्रेमीजनांना सुद्धा सुखद परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामात चांगले परिणाम मिळतील. आपल्या कामगिरीच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी होतील. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना चांगला लाभ होईल. त्यांना जास्तीत जास्त नफा होऊ शकतो. आपले आरोग्य उत्तम राहिले तरी ताप किंवा रक्तदोषाचा त्रास आपणास होण्याची संभावना आहे. हा आठवडा प्रवासासाठी प्रतिकूल आहे.

हा आठवडा आपल्यासाठी चांगलाच आहे. आपणास आपल्या कुटुंबाप्रती असलेल्या जवाबदारीची जाणीव झाल्याने आपण आपल्या प्राप्तीत वाढ करण्याचा विचार करू लागाल. आपल्या मनात काही गोष्टी येतील, ज्याचा फायदा आपण आपल्या व्यवसायात घ्याल. काहीजण ह्या आठवड्यात जोड व्यवसाय सुद्धा सुरु करू शकतील. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना चांगली फले मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांचे कष्ट व त्यांचे काम लोकांना दिसून येईल. वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करू शकतील. आपली प्रकृती नाजूक राहणार असल्याने आपणास आपल्या आहारावर अधिक लक्ष द्यावे लागेल. आपण शिस्तीत राहण्यास प्राधान्य द्याल. एखाद्याची चूक झाल्यास आपण लगेचच वाद घालू लागाल. अशा वादांपासून दूर न राहिल्यास कामाच्या बाबतीत आपलेच नुकसान होण्याची शक्यता आहे. आपण एखाद्या संपत्तीचा सौदा सुद्धा करू शकाल.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण आपल्या आईच्या सहवासात राहण्यास प्राधान्य द्याल. आईच्या सहवासात घालवलेले क्षण आपणास आनंदित करतील. आईच्या आशीर्वादाने कामात यश प्राप्त होईल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. आपल्या कामात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यापारात सरकारच्या नजरेस पडून आपले नुकसान होईल असे कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही ह्याची दक्षता व्यापाऱ्यांना घ्यावी लागेल. आरोग्यात बिघाड होण्याच्या शक्यतेमुळे आपल्या आहारावर लक्ष ठेवावे. पुष्कळ ताप येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सामान्यच राहील. अधून मधून वैवाहिक जोडीदाराचा राग आपणास त्रस्त करू शकतो. प्रेमीजनांसाठी हा आठवडा आनंदाने परिपूर्ण असेल. आपण आपल्या प्रणयी जीवनात यशस्वी वाटचाल करून आपल्या वडिलांशी त्या संबंधी काही महत्वाची चर्चा सुद्धा कराल.

बालदिना पासून सुरु होणारा हा आठवडा आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देईल. आपण काही नवनवीन आनंददायी गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करून आपल्या सभोवतालच्या लोकांना आनंदित करण्याच्या प्रयत्नात राहाल. त्यामुळे आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुधारणा होऊन कामाच्या ठिकाणी सुद्धा आपणास आनंद जाणवेल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. एकमेकांप्रती आकर्षण वृद्धिंगत होईल. प्रेमीजनांना काही सुखद क्षण घालविण्याची संधी मिळाली तरी आपल्या प्रिय व्यक्तीच्या बोलण्याने आपणास थोडे नैराश्य येण्याची शक्यता आहे. हा आठवडा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी चांगला आहे. आपल्या कामाचे यथोचित फल आपणास मिळेल. व्यापाऱ्यांना कामाचे चांगले फल मिळेल. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आपले मन आनंदित होईल. आरोग्य उत्तम राहिल्याने ह्या आठवड्यात आपण खूप आनंदात राहू शकाल.

हा आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या मित्रांसह एखाद्या प्रवासात असू शकता. त्याने आपण आनंदित व्हाल. मित्रांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. प्रणयी जीवनात आनंद वाढेल. आपल्या प्रिय व्यक्तीस सुंदरशी भेटवस्तू देऊन आपले व्यक्तिगत संबंध दृढ करू शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदमय राहील. आपण एक आदर्श जोडीदाराची भूमिका पार पाडाल व आपला वैवाहिक जोडीदार सुद्धा आपल्याकडे पूर्ण लक्ष ठेवून आपली जवाबदारी पार पाडेल. व्यापारात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामात प्रभुत्व प्राप्त होईल. आपला दबदबा निर्माण होऊन प्रतिमा उज्ज्वल होईल. फक्त वाईट बोलणे टाळावे तसेच अति आत्मविश्वासात राहू नये. खर्चात वाढ झाली तरी त्या अनुषंगाने प्राप्ती ठीकच राहील. आरोग्य उत्तम राहिल्याने कोणताही त्रास होणार नाही.

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक जवाबदाऱ्या पार पाडू शकाल. कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालविण्यास आपले प्राधान्य राहील. वैवाहिक जीवन दृढ होऊन वैवाहिक जोडीदाराच्या मदतीने भाग्य वृद्धी होईल. दूरवरचे प्रवास करून आपणास फायदा होईल. एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीच्या सल्ल्यानुसार काम केल्यास मोठा फायदा होऊ शकतो. व्यापारात प्रगती होईल. आपले मनोबल वाढेल. आरोग्य उत्तम राहील. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपल्या नात्यात सुधारणा होऊन एकमेकांशी जवळीक वाढेल. एकमेकांप्रती आकर्षण जाणवेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. आपला वैवाहिक जोडीदार त्याच्या भावंडांशी मिळून मिसळून राहील व त्यांच्यासह बाहेर फिरावयास जाण्याचे नियोजन करू शकेल. विद्यार्थ्यांना अध्ययनात चांगले परिणाम मिळतील. उच्च शिक्षणात यश प्राप्त होईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपण स्वतःकडे लक्ष देऊन आपल्या जवाबदाऱ्या सुद्धा समजून घ्याल. आपल्या व्यवहारात झालेल्या बदलामुळे आपणास आनंद तर होईलच व आपण थोडे अचंबित सुद्धा व्हाल. आपण आपले वैवाहिक जीवन सुधारण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करण्यास तयार राहाल. त्याचे सकारात्मक परिणाम आपणास दिसून येतील. आपला वैवाहिक जोडीदार आपल्यावर खुश होईल. सासुरवाडी कडील लोकांशी संवाद होऊन त्यांना भेटण्याची संधी मिळेल. एखाद्या घरगुती समारंभात हजेरी लावण्याचा कार्यक्रम आखू शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा समस्याग्रस्त असू शकतो. आपणास आपल्या कामाचा अपेक्षित फायदा होत नसल्याचे जाणवेल. अशा वेळेस शांत राहून धीराने काम करणे हितावह होईल. प्राप्ती चांगली होईल. व्यापाऱ्यांना आठवड्याच्या मधल्या दिवसात लाभ होईल. प्रेमीजनांना आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात दूरवर फिरावयास जाण्याची संधी मिळेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. आपण अभ्यासाचा आनंद घेऊ शकाल. त्याचे चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.