Photos: नव्या महाराष्ट्र केसरीला महिंद्राची थार गाडी सुपूर्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 04:35 PM2023-01-20T16:35:17+5:302023-01-20T16:58:10+5:30

नांदेडच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला अवघ्या दीड मिनिटात चीतपट करताना ६५ व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती व प्रतिष्ठेच्या ‘महराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली. शिवराज राक्षेच्या रूपाने महाराष्ट्राला नवा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळाला. स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या महेंद्र गायकवाड याला उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला मानाची गदा, महिंद्रा थार ही गाडी व रोख पाच लाख रुपयांचे बक्षीस तर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याला मानाची गदा, ट्रक्टर व रोख अडीच लाख रुपये देवून सन्मानित करण्यात आले होते. आज मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते महिंद्रा थार गाडी सुपूर्त करण्यात आली.

महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीत शिवराज व महेंद्र हे दोघेही तुल्ल्यबळ मल्ल यांनी एकमेकाना आजमावायला सुरुवात केली

शिवराज राक्षेला पंचाकडून कुस्ती करण्याची ताकीद मिळाली

शिवराजने महेंद्रवर ताबा घेण्याचा प्रयत्न करताना महेंद्रला दाबून टाकत चीतपट करताना महाराष्ट्र केसरीवर आपले नाव कोरले

नांदेडच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला अवघ्या दीड मिनिटात चीतपट केलं

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला मानाची गदा, महिंद्रा थार ही गाडी व रोख पाच लाख रुपयांचे बक्षीस

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला महिंद्रा थार ही गाडी सुपूर्त करण्यात आली

नांदेडच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला अवघ्या दीड मिनिटात चीतपट करताना ६५ व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती व प्रतिष्ठेच्या ‘महराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली

मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते गाडीची चावी देऊन सन्मान करण्यात आला

नवा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याची मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत थारची सफर