म्हणून रस्त्याशेजारील झाडांच्या बुंध्याला दिला जातो पांढरा रंग, असं आहे त्यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 12:54 PM2021-12-16T12:54:05+5:302021-12-16T12:57:14+5:30

Science News: रस्ता किंवा महामार्गाच्या शेजारी असलेल्या झाडांच्या बुंध्याला पांढऱ्या रंगाने रंगवलेले तुम्ही पाहिले असेल. मात्र या झाडांचा बुंधा पांढऱ्या रंगाने का रंगवला जातो, याचं कारण जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला का? त्यामुळे झाडावर काय परिणाम होतो, त्यामागे काय विज्ञान असतं, ते जाणून घ्या...

रस्ता किंवा महामार्गाच्या शेजारी असलेल्या झाडांच्या बुंध्याला पांढऱ्या रंगाने रंगवलेले तुम्ही पाहिले असेल. मात्र या झाडांचा बुंधा पांढऱ्या रंगाने का रंगवला जातो, याचं कारण जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला का? त्यामुळे झाडावर काय परिणाम होतो, त्यामागे काय विज्ञान असतं, ते जाणून घ्या...

शास्त्रीयदृष्या झाडांना पांढऱ्या रंगाने रंगवण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यांना रंगवण्यामध्ये चुन्याचा वापर केला जातो. चुन्याने रंगवल्यामुळे झाडाच्या खालच्या प्रत्येक भागात चुना पोहोचतो. त्यामुळे झाडाला कीड लागत नाही. तसेच झाडाचं वय वाढतं. चुना झाडाच्या बाह्य आवरणाला सुरक्षित ठेवण्यामध्ये काम करतो. तज्ज्ञ सांगतात की, बाहेरील आवरणावर चुना लावल्याने झाडाची साल तुटत नाही.

अनेक झाडं अशी असतात की, ज्यांना वरून कापलं जातं. त्यानंतर संपूर्ण झाडाला पांढऱ्या रंगाने रंगवले जाते. त्याच्या मागेसुद्धा एक शास्त्रीय कारण आहे. कॉर्नेल विद्यापीठाचे संशोधन सांगते की, रंगकामासाठी वापरला जाणारा पांढरा रंग हा सूर्याच्या तीव्र किरणांपासून होणाऱ्या नुकसानापासून झाडाच्या आवरणाला वाचवते.

झाडांना पांढऱ्या रंगाने रंगवण्यामागे एक अजून कारण आहे. लांब पल्ल्याच्या रस्त्यावर पांढऱ्या रंगामध्ये रंगवली गेलेली झाडे स्ट्रीट लाईट नसल्यावर रस्ता दाखवण्याचे काम करतात. अंधारामध्ये त्यावर प्रकाश पडला की, रस्ता किती स्वच्छ आहे हे दिसून येते. विशेषकरून घनदाट जंगलामध्ये असे अवश्य केले जाते. तसेच चालकांना मार्गदर्शन होते.

कॉर्नेल विद्यापीठामधील संशोधकांच्या मते, झाडांना पांढऱ्या रंगाने रंगवण्यासाठी कधीही ऑईल पेंटचा वापर करता कामा नये. त्याचा वापर केल्यास झाडांच्या वाढीवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. जर चुन्याचा वापर करत असाल तर त्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असले पाहिजे. त्यामुळे झाडांना कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.