पाकिस्तानातून कुटुंबासह भारतात आली, आता मंदिर प्रवेशावरून वादात अडकली... कोण आहे 'ही' तरुणी?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 07:38 PM2023-12-23T19:38:08+5:302023-12-23T20:06:02+5:30

व्हिडीओमध्ये वादग्रस्त काहीही नाही, तरीही वाद काय... जाणून घ्या

प्रसिद्ध यूट्यूबर कामिया जानी सध्या वादात आहे. कामिया जानीचा वाद एका व्हिडिओवरून निर्माण झाला आहे. हा व्हिडिओ पुरीच्या जगन्नाथ मंदिराचा आहे.

कामिया जानी एक प्रसिद्ध YouTuber आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. यूट्यूबवरील तिच्या चॅनलचे नाव कर्ली टेल्स आहे. कामिया जानीचे YouTube वर सुमारे 3 दशलक्ष सदस्य आहेत. याशिवाय कामिया जानीचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.

कामिया जानीच्या शोमध्ये फक्त खाणे-पिणे करण्यासोबतच सेलिब्रिटींच्या मुलाखती दाखवल्या जातात. तसेच तिच्या चॅनलवर खाद्यपदार्थ, प्रवास, अनुभव आणि लाइफस्टाईल याच्याशी संबंधित कंटेंट असतो.

कामियाने मंदिरात व्हिडिओ शूट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने सर्व ज्योतिर्लिंग आणि चारधामला भेट दिली होती.

कामिया या व्यवसायाने पत्रकार असून तिने 2006 मध्ये एका इंग्रजी वृत्तपत्रातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे कामियाने पत्रकारिता सोडली आणि जगभर फिरसाठी स्वतःचे यूट्यूब चॅनल तयार केले आणि त्यासाठी व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली.

स्वत:च्या चॅनेल्सवर तिने विराटपासून ते सचिनपर्यंत आणि विकी कौशलपासून ते अनन्या पांडेपर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतल्या आहेत.

कामिया जानीने समर वर्मासोबत लग्न केले आहे. दोघांना एक मुलगी जियाना वर्मा आहे. तर कामियाचे वडील मोहन जानी हे बिझनेसमन आहेत. फाळणीच्या वेळी कामिया जानीचे आजोबा नारायणदास जानी हे भारतात आले.

तिच्या पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या व्हिडिओमध्ये वादग्रस्त असे काहीही चित्रीकरण करण्यात आलेले नाही. पण तिच्या मंदिर प्रवेशावरून वाद सुरू आहे.

जगन्नाथ पुरी मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश बंदी असल्याचा भाजपचा दावा आहे, अशा परिस्थितीत कामियाला प्रवेश कसा दिला गेला? याशिवाय कामिया जानी गोमांस खाण्याची समर्थक असल्याचा आरोपही भाजपने केला आहे.

सर्व फोटो सौजन्य- कामिया जानी इन्स्टाग्राम