'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 10:34 AM2024-04-28T10:34:29+5:302024-04-28T10:35:51+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पुण्यात होणाऱ्या सभेवरून बारामतीमधील शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला (BJP) टोला लगावला आहे. आम्ही नरेंद्र मोदी यांचं स्वागत तुतारी वाजवून करू, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. 

Maharashtra Lok Sabha Election 2024: 'We will welcome Narendra Modi with trumpets', Supriya Sule's message from the meeting in Pune | 'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला

'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून ४५+ जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजपाने समोर ठेवलं आहे. तसेच शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये विजय मिळवण्यासाठीही भाजपा आणि महायुतीने मोर्चेबांधणी केली असून, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे जिल्ह्यामध्ये सभा होणार आहे. या सभेमधून पंतप्रधान मोदी पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन करणार आहेत. दरम्यान, या सभेवरून बारामतीमधील शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला टोला लगावला आहे. आम्ही नरेंद्र मोदी यांचं स्वागत तुतारी वाजवून करू, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. 

आज सकाळी सुप्रिया सुळे यांना प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेबाबत विचारण्यात आले. तेव्हा सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘अतिथी देवो भव! जेवढे पाहुणे येतील, त्यांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. तुतारी वाजवून आम्ही येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करू, असं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं.

यावेळी पूनम महाजन यांचं तिकीट कापण्यावरून सुप्रिया सुळे यांनी भाजपाला टोला लगावला. त्या म्हणाल्या की, पूनम महाजन यांनी अनेक वर्षे चांगलं काम केलं आहे. त्यांचे वडील प्रमोद महाजन हे केवळ भाजपाच नाही तर देशाच्या राजकारणातील एक मोठं होते. स्वत: पूनम महाजन यांनी भाजयुमोच्या माध्यमातून काम केलेलं आहे. त्यांचं तिकीट का कापण्यात आलं हे माझ्यासाठी आश्चर्यंकारक आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: 'We will welcome Narendra Modi with trumpets', Supriya Sule's message from the meeting in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.