रुबाबदार IPS ची कमाल; 2 वेळा नाकारली Bigg Boss ची ऑफर; होता नॅशनल लेव्हल क्रिकेटर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 03:33 PM2023-04-05T15:33:29+5:302023-04-05T15:39:01+5:30

IPS Sachin Atulkar : सचिन अतुलकर खेळात खूप चांगले आहेत, त्यांनी क्रिकेटमध्ये अनेक पराक्रम केले आहेत.

मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करता येतात. आतापर्यंत तुम्ही अनेक IAS आणि IPS च्या यशोगाथा वाचल्या असतील, पण आज अशा व्यक्तीच्या यशाबद्दल सांगणार आहोत ज्याची चर्चा संपूर्ण भारतात आहे. ते म्हणजे IPS अधिकारी सचिन अतुलकर.

सचिन यांची काही काळापूर्वी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळचे ACP म्हणून नियुक्ती झाली आहे. एसीपी म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी सचिन देशातील सर्वात तरुण डीआयजी बनला होते. याशिवाय वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी आयपीएस बनण्याचा विक्रमही त्यांनी आपल्या नावावर केला आहे.

सचिन हे मूळचे मध्य प्रदेशातील भोपाळचा आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी त्यांनी UPSC ची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती. 2007 मध्ये त्यांची आयपीएससाठी निवड झाली तेव्हा ते त्यांच्या बॅचमधील सर्वात तरुण आयपीएस अधिकारी बनले.

आयपीएसच्या प्रशिक्षणानंतर सचिन यांची जिथे जिथे नियुक्ती झाली, त्या ठिकाणी त्यांना सर्वात तरुण अधिकारी ही पदवी देण्यात आली. सचिन आपल्या फिटनेसची खूप काळजी घेतात. याच कारणामुळे ते त्यांच्या कामासोबतच त्यांच्या फिटनेसबद्दलही सतत चर्चेत असतात.

सचिन इतके तंदुरुस्त आहे की चांगले मॉडेल्स आणि बॉडीबिल्डर्सही त्यांच्यासमोर फिके पडतात. याच कारणामुळे सचिन यांना हँडसम पोलीस ऑफिसर म्हणूनही ओळखले जाते. सचिन यांच्या फिटनेसचे एक कारण म्हणजे बॉडीबिल्डिंगसोबतच त्याला खेळातही खूप रस आहे.

सचिन अतुलकर खेळात खूप चांगले आहेत, त्यांनी क्रिकेटमध्ये अनेक पराक्रम केले आहेत. राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू राहिले आहे. याशिवाय, त्यांनी त्यांच्या आयपीएस प्रशिक्षणादरम्यान घोडेस्वारीमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते.

फिटनेस आणि व्यक्तिमत्त्वाच्या बाबतीत सचिन एखाद्या मॉडेल किंवा बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाहीत. अशा परिस्थितीत, अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सचिन अतुलकरला यांना टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉसमधून दोनदा ऑफर मिळाल्या आहेत. मात्र, त्यांनी दोन्ही वेळा ही ऑफर नाकारली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.