Corona Virus : भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर; 324 जणांना संसर्ग, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 03:29 PM2024-05-22T15:29:35+5:302024-05-22T15:39:03+5:30

Corona Virus : सिंगापूरनंतर आता भारतातही हळूहळू कोरोनाचा प्रसार होत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, देशभरात आतापर्यंत 324 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Corona Virus new cases covid 19 corona sub variants corona jn1 300 case | Corona Virus : भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर; 324 जणांना संसर्ग, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण

Corona Virus : भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर; 324 जणांना संसर्ग, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण

सिंगापूरनंतर आता भारतातही हळूहळू कोरोनाचा प्रसार होत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, देशभरात आतापर्यंत 324 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. KP-1 आणि KP-2 या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अनेक राज्यांमध्ये हा संसर्ग पसरला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व जेएन 1 चे सब व्हेरिएंट आहेत आणि रुग्णालयात दाखल आणि गंभीर प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. म्हणून काळजी किंवा घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. म्युटेशन वेगाने होत राहतील आणि हे SARS-CoV2 सारख्या व्हायरसचे नैसर्गिक वर्तन आहे.  व्हायरसमुळे रोगाच्या तीव्रतेमध्ये कोणताही बदल शोधण्यासाठी संरचित पद्धतीने रुग्णालयांमधून नमुने देखील घेतले जातात.

भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) ने संकलित केलेल्या डेटावरून असे दिसून आले आहे की सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये KP.1 ची 34 प्रकरणे आढळून आली आहेत, त्यापैकी 23 प्रकरणे पश्चिम बंगालमधून नोंदवली गेली आहेत. गोवा (1), गुजरात (2), हरियाणा (1), महाराष्ट्र (4) राजस्थान (2) आणि उत्तराखंड (1) ही इतर राज्ये आहेत. 

आकडेवारीनुसार, KP.2 ची 290 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी सर्वाधिक 148 प्रकरणे महाराष्ट्रात नोंदली गेली आहेत. इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश म्हणजे दिल्ली (1), गोवा (12), गुजरात (23), हरियाणा (3), कर्नाटक (4), मध्य प्रदेश (1), ओडिशा (17), राजस्थान (21), उत्तर प्रदेश ( 8), उत्तराखंड (16) आणि पश्चिम बंगाल (36) आहेत. 

सिंगापूरमध्ये 5 ते 11 मे या कालावधीत 25,900 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आल्याने सिंगापूरमध्ये कोरोनाची नवी लाट दिसत आहे, ज्यामध्ये KP.1 आणि KP.2 ही सिंगापूरमधील दोन तृतीयांश प्रकरणं आहेत. जागतिक स्तरावर, प्रबळ COVID-19 रूपं अजूनही JN.1 आणि KP.1 आणि KP.2 सह त्याचे उप-वंश आहेत.

KP.1 आणि KP.2 हे COVID-19 व्हेरिएंटच्या गटाशी संबंधित आहेत शास्त्रज्ञांनी त्यांच्या म्युटेशनच्या तांत्रिक नावांवर आधारित 'FLiRT' टोपणनाव दिलं आहे. FLiRT मधील सर्व स्ट्रेन हे JN.1 व्हेरिएंटचे वंशज आहेत, जो Omicron व्हेरिएंटचा एक भाग आहे. KP.2 चे जागतिक आरोग्य संघटनेच्या देखरेखीखाली एक व्हेरिएंट म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे. 
 

Web Title: Corona Virus new cases covid 19 corona sub variants corona jn1 300 case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.