ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 11:35 AM2024-05-22T11:35:33+5:302024-05-22T11:36:59+5:30

Pune Porsche Car Accident Case Update: ज्या आजोबांनी बाल न्यायालयात प्रतापी नातवाची हमी दिली त्यांच्याबाबत धक्कादायक खुलासा समोर येत आहे. छोटा राजनशी संबंध.

The grandfather surendra kumar agarwal who guaranteed vedant, his connection with Chhota Rajan; Argument with brother over property, shooting at friend Pune Porsche accident Case | ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार

ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण वेगवेगळे वळण घेत आहे. दारुच्या नशेत दोघांचा जीव घेतला तरी बड्या बिल्डरच्या बाळाला अवघ्या १५ तासांत जामीन मिळल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. अशातच याच अग्रवाल कुटुंबातील एका कार्ट्याने एक अलिशान कार दुभाजकाला धडकवल्याचा किस्साही चर्चिला जात आहे. आता ज्या आजोबांनी बाल न्यायालयात प्रतापी नातवाची हमी दिली त्यांच्याबाबत धक्कादायक खुलासा समोर येत आहे. या आजोबांनी छोटा राजनशी संधान साधत त्यांच्याच भावाच्या मित्रावर गोळीबार केला होता, असे समोर येत आहे. 

त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप

बिल्डर विशाल अग्रवालच्या प्रतापी बाळावर आरटीओ मोठी कारवाई करण्याच्या तयारीत, 1780 रुपये भरले नव्हते...

अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी संपत्तीच्या वादातून आपल्याच भावावर गोळीबार करायला लावला होता. यासाठी छोटा राजनची मदत घेतली होती. राजनच्या गुंडांनी अग्रवाल यांच्या भावावर गोळ्याही झाडल्या होत्या. या प्रकरणात हत्येच्या प्रयत्नावरून एफआयआर देखील दाखल करण्यात आला होता. आधी पोलिसांनी तपास केला नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले होते. ही केस कोर्टात प्रलंबित आहे, त्याच आजोबाच्या हमीवर बाल न्यायालयाने आरोपीला हास्यास्पद अटींवर जामीन दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आजतक, टीव्ही ९ ने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सुरेंद्र कुमार यांनी त्यांचा भाऊ आरके अग्रवाल यांच्यात काही वर्षांपूर्वी संपत्तीवरून वाद सुरु होता. सुरेंद्र कुमार यांनी यासाठी छोटा राजनची मदत घेत गोळीबार करवला होता. बंड गार्डन पोलिस ठाण्यात या प्रकरणी अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. भोसले हे आर के अग्रवाल यांचे मित्र आहेत. सुपारी देऊन राजनच्या गुंडांना भोसलेला मारण्यासाठी पाठविले होते. यामध्ये भोसलेंचा ड्रायव्हरही जखमी झाला होता. हे प्रकरण मुंबईच्या सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. 

नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?

सीबीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आरकेसोबत वाद संपविण्यासाठी एसकेनी छोटा राजनशी हातमिळवणी केली होती. यासाठी ते छोटा राजनचा गुंड विजय पुरूषोत्तम साळवी उर्फ विजय तांबट याला बँकॉकला जाऊन भेटले होते, असे सीबीआयच्या सुत्रांनी सांगितले आहे. हे गोळीबार प्रकरण २००९ चे आहे. 

Web Title: The grandfather surendra kumar agarwal who guaranteed vedant, his connection with Chhota Rajan; Argument with brother over property, shooting at friend Pune Porsche accident Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.