"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 04:22 PM2024-05-22T16:22:18+5:302024-05-22T16:30:56+5:30

Kailash Vijayvargiya And Kamalnath : मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांनी दावा केला की कमलनाथ यांना भाजपामध्ये प्रवेश करायचा होता.

Kailash Vijayvargiya big disclosure on Kamalnath know what did he say | "त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा

"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा

मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांनी दावा केला की कमलनाथ यांना भाजपामध्ये प्रवेश करायचा होता. पण हे शक्य झालं नाही. मध्य प्रदेशातील सर्व 29 जागांवर भाजपा विजयी होईल, असा दावाही विजयवर्गीय यांनी केला. लोकसभा निवडणुकीत विजयवर्गीय यांना भाजपाने छिंदवाडा विभागाचे प्रभारी बनवलं होतं जेथे पहिल्या टप्प्यात निवडणुका झाल्या.

भारत 24 शी बोलताना कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, "फक्त छिंदवाडा आणि मंडलाच नाही तर आम्ही मध्य प्रदेशातील 29 पैकी 29 जागा जिंकू. छिंदवाडा नक्कीच जिंकू.'' तसेच माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याबद्दल विजयवर्गीय यांनी सांगितलं की, काही गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत. कमलनाथ यांना यायचं होतं पण ते शक्य झालं नाही, ते का शक्य झालं नाही हे मी सांगू शकत नाही. निवडणुकीच्या घोषणेपूर्वी कमलनाथ यांच्या भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत जोरदार चर्चा सुरू होती.

छिंदवाडा हा कमलनाथ यांचा बालेकिल्ला आहे. सध्या त्यांचा मुलगा नकुलनाथ येथून खासदार आहे. काँग्रेसने त्यांना पुन्हा एकदा लोकसभेचे तिकीट दिले आहे. निवडणुकीदरम्यान कैलाश विजयवर्गीय यांनी छिंदवाडामध्ये काँग्रेसकडून पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला होता. त्यांनी निवडणूक आयोगाकडे नकुलनाथ राहत असलेल्या घराची झडती घेण्याची विनंती केली होती.

इंदूर आणि अक्षय कांती बम यांच्यावर कैलाश विजयवर्गीय म्हणाले की ते आले आहेत आणि आम्ही त्यांचे स्वागत केले. विरोधकांच्या आरोपांवर ते म्हणाले की, हे सर्व अचानक घडले आहे. उमेदवारी मागे घेताना ते म्हणाले की, मी तिथेही गेलो नाही. होय, मी एक सेल्फी घेतला. खरे तर काँग्रेसने अक्षय कांती बम यांना इंदूरमधून उमेदवार केले होते पण निवडणुकीपूर्वीच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
 

Web Title: Kailash Vijayvargiya big disclosure on Kamalnath know what did he say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.