हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 23:10 IST2025-05-09T23:08:19+5:302025-05-09T23:10:33+5:30

India Pakistan Tension: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पाकिस्तानने काल भारतातील अनेक भागांना लक्ष्य करून सुमारे ३०० ते ४०० ड्रोन सोडले होते. मात्र भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी हे ड्रोन हवेतच नष्ट केले होते. हे ड्रोन तुर्कीमध्ये तयार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानने वापरलेले तुर्कीचे ड्रोन नेमके कोणते होते आणि त्यांची काय वैशिष्ट्ये होती याचा आपण आढावा घेऊयात.

भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पाकिस्तानने काल भारतातील अनेक भागांना लक्ष्य करून सुमारे ३०० ते ४०० ड्रोन सोडले होते. मात्र भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी हे ड्रोन हवेतच नष्ट केले होते. हे ड्रोन तुर्कीमध्ये तयार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानने वापरलेले तुर्कीचे ड्रोन नेमके कोणते होते आणि त्यांची काय वैशिष्ट्ये होती याचा आपण आढावा घेऊयात.

गुरुवारी रात्री पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यादरम्यान, पाकिस्तानने वापरलेल्या ड्रोनच्या अवशेषांच्या फॉरेन्सिक विश्लेषणावरून हे ड्रोन तुर्कीमध्ये निर्मिती झालेले असिसगार्ड सोंगार मॉडेलचे असल्याचे समोर आले आहे.

लष्कराने सांगितले की, हे ड्रोन टेहेळणी आणि अचूक हल्ल्यांसाठी वापरले जातात. सोंगार असिसगार्डचा वापर तुर्कीच्या सशस्त्र दलांकडून केला जातो. या ड्रोनचं वैशिष्ट्य म्हणजे सिक्युरिटी ऑपरेशनदरम्यान, लक्ष्याची आधीपासून माहिती घेऊन त्याला नष्ट करू शकते.

दरम्यान, आज संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये परराष्ट्र मंत्रालयाने माहिती देताना भारतावरील शहरांवर हल्ले करण्यासाठी तुर्कीच्या ड्रोनचा वापर केला होता, असे सांगितले होते.