"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 13:39 IST2025-12-24T13:38:30+5:302025-12-24T13:39:44+5:30
Uddhav Thackeray And Raj Thackeray : भाजपाने आता खोचक टोला लगावला आहे.

"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा केली. गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रातील जनता ज्याची प्रतिक्षा करत होती, ती शिवसेना-मनसे युतीची घोषणा आज आम्ही जाहीर करतोय. कोण किती जागा लढवणार याचे आकडे आम्ही सांगणार नाही परंतु जे उमेदवार असतील त्यांना कळवलं जाईल असं म्हटलं जात आहे. यावरून भाजपाने आता खोचक टोला लगावला आहे.
"नेमके कशासाठी झाला होतात त्यावेळी वेगळे? नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "लाव रे तो व्हिडीओ" असे आता मुंबईकर म्हणतील, तुमची जुनी भाषणे काढून आरसा समोर धरतील!" असंही म्हटलं आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्वीटवर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे.
घेरलं होतं मातोश्रीवरील \"विठ्ठलाला\" बडव्यांनी..
\— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 24, 2025
तुमच्या मते, पक्षाचा ताबा घेतला होता चार कारकुनांनी...
एवढ्या मोठ्या संघटनेला संपवण्यात तुम्हाला व्हायचे नव्हते \"भागीदार\"
सगळ्या पदांचे राजीनामे देत भाषण केले होते खुमासदार !
आज तेच बडवे आणि तेच कारकून चालणार का?
त्यांच्यासोबत…
"घेरलं होतं मातोश्रीवरील "विठ्ठलाला" बडव्यांनी... तुमच्या मते, पक्षाचा ताबा घेतला होता चार कारकुनांनी... एवढ्या मोठ्या संघटनेला संपवण्यात तुम्हाला व्हायचे नव्हते "भागीदार". सगळ्या पदांचे राजीनामे देत भाषण केले होते खुमासदार! आज तेच बडवे आणि तेच कारकून चालणार का? त्यांच्यासोबत बेमालूमपणे भागीदार होणार का?"
"लाव रे तो व्हिडीओ" असे आता मुंबईकर म्हणतील, तुमची जुनी भाषणे काढून आरसा समोर धरतील! तुमचा चेहरा बघून तुम्हाला भीती नाही ना वाटणार? एकत्र येऊन पालिकेची तिजोरी नाही ना लुटणार? मुंबईकर गल्लोगल्लीत तुम्हाला विचारणार..."नेमके कशासाठी झाला होतात त्यावेळी वेगळे?" "नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.