India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 09:44 AM2020-06-25T09:44:27+5:302020-06-25T10:03:18+5:30

धोकेबाज चीनला 'ईट का जवाब पत्थर' से देण्यासाठी, आता भारताने पूर्ण तयारी केली आहे. शक्तिशाली टी-90 टँक्स (यालच 'भीष्म'देखील म्हणतात) विमानाच्या सहाय्याने लडाखच्या मैदानात पोहोचले आहेत. टी-90 टँक तैनात करून भारताने चीनला जबरदस्त इशारा दिला आहे. टी-72 टँकचा एक ताफा आधिपासूनच लडाखमध्ये तैनात आहे.

शत्रूच्या विमानांना हवेतच उद्ध्वस्त करण्याची सक्षण असलेल्या अत्याधुनिक अॅन्टी एअरक्राफ्ट गन आणि सैनिकांचे एक विशेष पथकही लडाखमध्ये पोहोचले आहे. लद्दाख आणि काश्मीरात बुधवारीदेखील लढाऊ विमानांनी हावेत झेप घेऊन आपल्या तयारीला धार दिली.

लद्दाखमध्ये गेल्या आठवडाभरात टी-90 टॅन्क पोहोचवण्यात आले आहेत. ते चुशूल आणि गलवान भागात तैनातही करण्यात आले आहेत.

भीष्म टँक जगातील सर्वात अचूक टँकपैकी एक आहे. चीनने एलएसीच्या त्या भागात आपल्या मुख्य बेसवर बख्तरबंद गाड्यांसोबतच टी-95 टँक तैनात केले आहेत. त्या टँकपेक्षा भीष्म कितीतरी पटीने जबरदस्त आहे. टी-90 टँक सुरुवातीला रशियातूनच तयाह होऊन आले होते. त्यानंतर त्यांना आणखी आधुनिक करण्यात आले.

ही आहे 'भीष्म'ची खासियत - एका मिनिटात आठ गोळे डागण्याची क्षमता असलेला हा टँक जैविक आणि रासायनिक शस्त्रांचाही समर्थपणे सामना करू शकतो.

या टँकचे आर्मर्ड प्रोटेक्शन जगात अत्यंत उत्कृष्ट मानले जाते, जे क्षेपणास्त्राचा हल्लाही रोखू शकते.

एक हजार हॉर्स पावर इंजनची क्षमता असलेला हा टँक दिवसा आणि रात्रीही लढण्यासाठी सक्षम आहे.

विशेष म्हणजे, या टँकच्या माध्यमाने सहा किलोमिटरपर्यंत क्षेपणास्त्रेही डागली जाऊ शकतात.

महत्वाचे म्हणजे, जगातील सर्वात हलक्या टँकमध्ये यां टँकची गणना होते. याचे वजन केवळ 48 टन आहे.

हा टँक 72 किलो मीटर एवढ्या वेगाने धावू शकतो.

दमचोक आणि चुशूल भागातील रेतीसारख्या असलेल्या आणि सपाट जमिनीवर हा टँक वेगाने चालू शकतो.

भारतीय जवानांनी अगदी 18 हजार फूट ऊंचावरही हा टँक चालवला आहे. एवढ्या उंचावरही सहजपणे टँक चालवण्याचा अनुभव भारतीय जवानांना आहे.

शक्तिशाली टी-90 'भीष्म' टँक्स