IAS रिया डाबीने गुपचुप केलं लग्न; 'या' IPS अधिकाऱ्यासोबत बांधली लगीनगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 04:44 PM2023-06-19T16:44:31+5:302023-06-19T16:50:17+5:30

IAS रिया डाबी 2021 बॅचची अधिकारी असून, IAS टीना डाबीची लहान बहिण आहे.

IAS Ria Dabi Wedding: देशातील लोकप्रिय IAS अधिकाऱ्यांचा विषय निघतो, तेव्हा टीना डाबी आणि तिची बहीण रिया डाबी यांचे नाव नक्कीच समोर येते. 2021 बॅचची IAS अधिकारी रिया डाबी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. IAS रियाने IPS अधिकारी मनीष कुमारशी गुपचूप लग्न केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रियाने 20 एप्रिललाच मनीषसोबत कोर्ट मॅरेज केले.

रिया आणि मनीष 2021 मध्ये अधिकारी झाले. त्यांची ओळख मसुरीमध्ये झाली. रिया डाबी राजस्थानमध्ये कर्तव्य बजावत असून, मनीष कुमार महाराष्ट्रात कर्तव्य बजावत आहे. मनीषने राजस्थान केडरसाठी अर्ज केला होता आणि केंद्राने तो अर्ज स्वीकारला आहे. त्यामुळे आता मनीषदेखील राजस्थानमध्ये पदभार सांभाळणार आहेत. दोघांनी एप्रिल महिन्यात परस्पर संमतीने कोर्ट मॅरेज केले होते. आता लवकरच दोघेही ग्रँड रिसेप्शन देणार आहेत.

रिया डाबी आणि मनीष कुमार या भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2021 बॅचचे अधिकारी आहेत. रिया सध्या तिच्या प्रशिक्षण कालावधीत असून, राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात असिस्टंट कलेक्टर पदावर कार्यरत आहे. रिया डाबी जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी यांची धाकटी बहीण आहे. रियाची मोठी बहीण टीना डाबीने 2016 मध्ये देशभरातून UPSC मध्ये टॉप केले होते. तर, रियाने 2021 मध्ये UPSC उत्तीर्ण करून देशात 15 वा क्रमांक मिळवला होता.

रिया आणि मनीष यांनी घरच्यांच्या संमतीने कोर्ट मॅरेज केले आहे. पण आता ते लवकरच रिसेप्शन देणार आहेत. दोघांचे कुटुंबीय त्यांच्या तयारीत व्यस्त आहेत. मनीष कुमार यांना लवकरच राजस्थानमध्ये पोस्टिंग मिळणार आहे. त्यांची पोस्टिंग झाल्यानंतर जयपूर किंवा राजस्थानमधील इतर चांगल्या ठिकाणी रिसेप्शनचे आयोजन केले जाणार आहे.

टीना डाबी आणि रिया डाबी, या दोघीही प्रसिद्ध अधिकारी आहेत. टीना सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांची फॅन फॉलोइंगही मोठी आहे. त्या आयुष्यातील प्रत्येक लहान-मोठा आनंद सोशल मीडियावर शेअर करत असतात. रियादेखील सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. तिचेही 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

2021 बॅचचे आयपीएस अधिकारी मनीष कुमार हे दिल्लीचे रहिवासी आहेत. B.Tech केल्यानंतर मनीष कुमार यांनी नागरी सेवेत जाण्याचा विचार केला आणि UPSC ची तयारी सुरू केली.

2021 मध्ये त्यांनी 581 रँक मिळवून यूपीएससी परीक्षेत यश मिळविले. मसुरीमध्ये प्रशिक्षणादरम्यान रिया आणि मनीषशी भेट झाली. दोघांचेही एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.