महिला IAS अधिकाऱ्याचे भाड्याने घर, रात्रीचे चालायचे काळे धंदे; छाप्यात प्रत्येक खोलीत सापडल्या मुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 15:33 IST2026-01-05T15:21:22+5:302026-01-05T15:33:19+5:30
प्रयागराजमधील दाट लोकवस्ती असलेल्या किडगंज भागात एका महिला आयएएस अधिकाऱ्याच्या १५,००० रुपयांच्या भाड्याच्या घरात एका कथित सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. रात्रीच्या वेळी मुला-मुलींच्या वाढत्या हालचालींमुळे परिसरातील लोकांनी पोलिसांना माहिती दिली. छाप्यादरम्यान चार मुली, चार मुले सापडले.

प्रयागराज शहरातील जुन्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या किडगंज भागात एका महिला आयएएस अधिकाऱ्याचे घराचे मासिक भाडे १५,००० रुपये होते. या घरात कुटुंबासोबत राहण्याचा करार केला होता. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होते, पण रात्रीच्या वेळी मुला-मुलींच्या वाढत्या हालचाली शेजाऱ्यांना दिसल्या. त्यावेळी शेजाऱ्यांचा संशय वाढला, यानंतर शेजाऱ्यांनी तक्रारी केल्या. यानंतर पोलिसांनी एक दिवस छापा टाकला. या छाप्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

रविवारी, एका महिला आयएएस अधिकाऱ्याच्या भाड्याच्या घरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केल्याने किडगंज परिसर हादरला. छाप्यादरम्यान प्रत्येक खोलीतून धक्कादायक चित्रे समोर आली. वेगवेगळ्या खोल्यांमध्ये मुले आणि मुली आक्षेपार्ह स्थितीत आढळले, तर संपूर्ण नेटवर्कवर चालवणारा मास्टरमाइंड घराबाहेरून घटनास्थळाचे निरीक्षण करताना पकडला.

किडगंज परिसरात असलेले हे घर गेल्या काही महिन्यांपासून स्थानिकांसाठी एक गूढ बनले होते. या ठिकाणी काहीतरी वेगळे सुरू असल्याचा अनेकांना संशय होता. दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी अनोळखी लोक, मुले आणि मुली, सतत येत-जात होते.

सुरुवातीला, शेजारच्या लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले, कारण त्यांना वाटले की ही भाडेकरूंमधील खाजगी बाब आहे. पण ज्यावेळी रात्री उशिरापर्यंत ही गर्दी वाढली आणि दररोज नवीन चेहरे दिसू लागले, तेव्हा चर्चा सुरू झाल्या. सुरुवातीला त्या बंगल्यात कुटुंबीय राहत असल्याचा दावा केला होता, यामुळे त्यांना काही संशय आला नाही. पण काही दिवसानंतर परिस्थिती बदलली. शेवटी, काही जागरूक लोकांनी पोलिसांना या गोष्टीची माहिती दिली.

तक्रार मिळाल्यानंतर, तात्काळ कारवाई करण्याऐवजी, पोलिसांनी आधी गुप्तपणे पाळत ठेवण्यास सुरुवात केली. संशयास्पद हालचालींची पुष्टी झाल्यानंतर, एक विशेष पथक तयार करण्यात आले. नियोजित पद्धतीने, पोलिस पथक अनपेक्षितपणे घरात पोहोचले.

पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांनी दार उघडण्यासाठी अनेक वेळा हाक मारली, पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांचा संशय वाढत गेल्याने त्यांनी दार उघडण्यास भाग पाडले. पोलिस आत येताच, प्रत्येक खोलीतील दृश्याने पोलिसांना धक्का बसला.

छाप्यादरम्यान, घराच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये चार तरुणी आणि चार तरुण आक्षेपार्ह स्थितीत आढळले. खोल्यांमधून काही संशयास्पद आणि आक्षेपार्ह वस्तू देखील जप्त करण्यात आल्या. दरम्यान, घराबाहेर उभा असलेला एक माणूस पोलिसांना संशयास्पद वाटला. चौकशीदरम्यान, त्याचे नाव सर्वेश दुबे असे आढळून आले, जो संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार असल्याचे सांगितले जाते. सर्वेश बाहेरून आत चालणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवत होता.े

पोलिस तपासात हे घर एका महिला आयएएस अधिकाऱ्याचे असल्याचे समोर आले. तिने ते घर सुमारे तीन महिन्यांपूर्वी सर्वेश दुबे यांना भाड्याने दिले होते. भाडे १५,००० रुपये प्रति महिना ठरले होते. भाडेकरारात स्पष्टपणे नमूद केले होते की भाडेकरू त्याच्या कुटुंबासह राहील. सुरुवातीला, सर्वेशने शेजारच्या लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी काही काळासाठी त्याच्या कुटुंबाला घरात ठेवले होते.

यामुळे कोणताही संशय निर्माण झाला नाही. काही दिवसांनंतर, त्याने त्याचे कुटुंब अतरसुया येथील त्याच्या जुन्या घरात हलवले. यानंतर दिवसरात्र नवीन चेहरे दिसू लागले. तरुणी आणि तरुणांची, विशेषतः रात्रीच्या वेळी, हालचाल हळूहळू वाढू लागली. यामुळे परिसराला त्रास होऊ लागला.

















