शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: 18 राज्यांतून येतेय 'खूश खबर'; पण, 'या' राज्यांमध्ये मात्र कोरोनाचा 'स्फोट'!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 11:48 AM

1 / 11
कोरोना महामारीचा सामना करणाऱ्या भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. 10 जूनपासून भारतात बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या, अॅक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत अधिक आहे. 15 जूनपर्यंत, जवळपास 1.75 लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर अॅक्टीव्ह रुग्ण जवळपास दीड लाख आहेत. यात भारतातील 18 राज्ये अशी आहेत, जेथे कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत अधिक आहे. मात्र, कोरोनाचा सर्वात कठीन काळ संपला, असा याचा अर्थ होत नाही.
2 / 11
कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्‍ट्राला बसला आहे. मात्र आता येथे नवे रुग्ण आढळण्याचा दर कमी झाला आहे. तर दिल्लीत रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. गुजरातची स्थिती आता सुधरू लागली आहे. तर तामिळनाडूमध्ये रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. असेही काही राज्ये आहेत, जेथे कोरोनाचा फारसा परिणाम झालेला नव्हता, मात्र आता तेथेही रुग्ण संख्या वेगाने वाढत आहेत.
3 / 11
नवे रुग्ण आणि रिकव्हरीमध्ये असं कनेक्‍शन - ज्या राज्यांत कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, तेथे रिकव्हरीपेक्षा अॅक्टिव्ह रुग्ण अधिक आहेत. तर जेथे कोरोनाचे रुग्ण कमी आढळून येत आहेत, तेथे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
4 / 11
दिल्‍ली, झारखंडमध्ये नवे रुग्ण आणि अॅक्टिव्ह रुग्णही अधिकच - सध्या दिल्‍ली, हरियाणा, आसाम, छत्‍तीसगड आणि झारखंडमध्ये नवे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. येथे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत अधिक आहे.
5 / 11
तामिळनाडू राज्य अपवाद - मोठ्या राज्यांमध्ये एकमेव तामिळनाडू राज्यच अपवाद आहे, जेथे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. हरियाणामध्ये गेल्या महिन्यापर्यंत परिस्थिती नियंत्रणात आहे, असे वाटत होते. मात्र या महिन्यात येथे मोठ्या संख्येने रुग्ण समोर आले आगेत.
6 / 11
पश्चिम बंगाल, तेलंगाणा वाढवतायत चिंता, आंध्र प्रदेश आणि ओडिशाचा रिकव्हरी रेट अधिक - आंध्र प्रदेश, ओडिशा आणि उत्‍तराखंडमध्ये रुग्णांची संख्या राष्ट्रीय सरासरीपेक्षाही (3.8%) वेगाने वाढत आहेत. मात्र, तरीही येथे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा अधिक आहे. आंध्र आणि ओडिशामध्ये गेल्या काही दिवसांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
7 / 11
पश्चिम बंगाल आणि तेलंगाणामध्ये अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या बऱ्या होणाऱ्या रुग्ण संख्येपेक्षा फार अधिक आहे. गेल्या काही आठवड्यांत येथील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
8 / 11
महाराष्‍ट्र, जम्मू-काश्मीर आणि केरळमध्ये दोन्ही आकडे जवळपास सारखेच - राष्ट्रीय सरासरीचा विचार करता, कमी रुग्ण आढळणाऱ्या राज्यांत मिक्‍स्‍ड पॅटर्न दिसून येत आहे. केरळ, महाराष्‍ट्र आणि जम्‍मू-काश्‍मीरमध्ये अॅक्टिव्ह आणि रिकव्हर्ड रुग्णांचा आकडा जवळपास सारखाच आहे. उत्‍तर प्रदेश, कर्नाटक आणि बिहारमध्ये रिकव्हर्ड रुग्णांची संख्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत अधिक आहे.
9 / 11
पंजाब, मध्‍य प्रदेश, राजस्‍थान आणि गुजरातने मिळवले नियंत्रण - देशातील चार राज्ये - मध्‍य प्रदेश, गुजरात, राजस्‍थान आणि पंजाबमध्ये नवे कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. येथील बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा अधिक आहे. या चारही राज्यांमध्ये नवे कोरोना रुग्ण सापडण्याचा दर 2 ते 3 टक्क्यांदरम्यान आहे.
10 / 11
सिक्किम, गोवा, लडाख, नगालँड, मणिपूरमध्ये 'कोरोना स्‍फोट' - देशाच्या दृष्टीने चिंतेचा विषय म्हणजे ही छोटी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोना झपाट्याने फोफावत चालला आहे. आतापर्यंत जेथे 1,000पेक्षाही कमी रुग्ण होते, तेथे आता रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.
11 / 11
गोव्याने स्वतःला कोरोनामुक्त घोषित केले होते, येथेही आता वेगाने कोरोनाबाधित समोर येत आहेत. सिक्किम, नगालँड, मिझोरम, मणिपूरमध्ये जून सुरू होईपर्यंत फार कमी रुग्ण होते. मात्र, गेल्या दोन आठड्यात येथे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हीच परिस्थिती अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि दादरा नगर हवेलीचीही आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्रdelhiदिल्लीGujaratगुजरातwest bengalपश्चिम बंगाल