Join us  

IPL 2024 LSG vs MI : लखनौने टॉस जिंकला! हार्दिकच्या पदरी निराशा; १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूला संधी

IPL 2024 LSG vs MI Live Match Updates: आज लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 7:03 PM

Open in App

IPL 2024 LSG vs MI Live Match Updates In Marathi | लखनौ : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील ४८ व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने आहेत. गुणतालिकेतील पाचवा संघ विरूद्ध नववा संघ अशी लढत होत आहे. मुंबईच्या संघासाठी आजचा सामना करा किंवा मरा असाच काहीसा आहे. कारण प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी मुंबईला आजचा सामना जिंकणे फार महत्त्वाचे आहे. लखनौच्या एकाना स्टेडियमवर आजचा सामना होत आहे. आजच्या सामन्यासाठी लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) 

आजच्या सामन्यातून लखनौच्या संघात मयंक यादवचे पुनरागमन झाले आहे, तर क्विंटन डीकॉकला वगळण्यात आले आहे. तसेच यजमान लखनौच्या संघात महाराष्ट्रातील १९ वर्षीय अर्शीन कुलकर्णीला संधी मिळाली. लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर मी देखील प्रथम गोलंदाजीसाठी इच्छुक होतो, असे मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने सांगितले.

मुंबईचा संघ -हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहाल वढेरा, मोहम्मद नबी, गेराल्ड कोएत्जी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह.  लखनौचा संघ -लोकेश राहुल (कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, दीपक हुड्डा, निकोलस पूरन, एश्टन टर्नर, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, मयंक यादव. 

मुंबईचा संघ यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून संघर्ष करत आहे. मुंबईच्या संघाची सलामी जोडी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. रोहित शर्मा आणि इशान किशान दोघेही संघाला वेगवान सुरुवात करून देण्यात सातत्याने यशस्वी ठरताना दिसत आहेत. ही मुंबईच्या संघाची जमेची बाजू म्हणता येईल. तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आणि चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा हे दोन्ही फलंदाजी चांगल्या लयीत असल्याचे दिसत आहेत. पण, सांघिक खेळीचा अभाव मुंबईच्या पराभवाला कारणीभूत ठरत आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्सलखनौ सुपर जायंट्स