Join us  

रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय दिल्ली कॅपिटल्सला महागात पडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 9:14 PM

Open in App

IPL 2024, Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Live Marathi : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय दिल्ली कॅपिटल्सला महागात पडला. कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना पाहुण्यांना जखडून ठेवले. दडपणात त्यांनी विकेटही फेकल्या. KKR च्या सुनील नरीन व वेंकटेश अय्यर या फिरकीपटूंनी खेळपट्टीचा चांगला उपयोग केला. वैभव अरोरा, हर्षित राणा व मिचेल स्टार्क या जलदगती गोलंदाजांनी सुरुवातीलाच DC ला धक्के दिले होते. दिल्लीसाठी कुलदीप यादवने सर्वाधिक धावा करून KKR समोर सन्मानजनक लक्ष्य उभे केले.

KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 

DC ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, KKR समोर तगडे लक्ष्य ठेवण्याचा निर्धार रिषभ पंतने व्यक्त केला. मिचेल स्टार्कच्या पहिल्याच षटकात पृथ्वी शॉ याने तीन सुरेख चौकार खेचले. पण, वैभव अरोराने दुसऱ्या षटकात पृथ्वीला ( १३) माघारी पाठवले. जॅक फ्रेझर-मॅकगर्क ( १२) याला शांत ठेवण्यात KKR ला यश आले. स्टार्कच्या गोलंदाजीवर वेंकटेश अय्यरने सुरेख झेल टिपून मॅकगर्कला माघारी पाठवले. अरोराने अप्रतिम इनस्विंग चेंडू टाकून शे होपचा ( ६) त्रिफळा उडवला. ३७ धावांत आघाडीचे ३ फलंदाज दिल्लीने गमावले. पण, रिषभ पंत व अभिषेक पोरेल यांनी चांगला खेळ करताना संघाला पॉवर प्लेमध्ये ३ बाद ६७ धावांपर्यंत पोहोचवले.  हर्षित राणाच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात पोरेल ( १८) याचे दोन्ही त्रिफळे उडाले. रिषभसह त्याची १९ चेंडूंत ३१ धावांची भागीदारी संपुष्टात आली.  वरुण चक्रवर्थीच्या पहिल्याच चेंडूवर रिषभचा ( १८) सोपा झेल हर्षितने टाकला आणि गौतम गंभीर, शाहरुख खान यांनी हाताने तोंड लपवले. अरोराच्या स्लोव्हर चेंडूवर रिषभ फसला अन् बॅट त्याच्या हातून निसटली. पण, झेल घेण्यासाठी खेळाडू जागेवर नसल्याने त्याला पुन्हा जीवदान मिळाले. DC ने १० षटकांत ४ बाद ९३ धावा उभ्या केल्या. पण, ११व्या षटकात अखेर चक्रवर्थीला विकेट मिळाली आणि रिषभ ( २७) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फसला. चक्रवर्थीने DC च्या त्रिस्तान स्तब्सला ( ४) आज शांत ठेवले अन् ९९ धावांवर सहावा धक्का दिला.  दिल्लीने कुमार कुशाग्र याला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानावर पाठवले. सुनील नरीनने दिल्लीच्या अक्षर पटेलचा ( १५) त्रिफळा उडवून KKR ला सामन्यावर पकड मजबूत करून दिली. वरुणने त्याची तिसरी विकेट घेताना कुमारला ( १) झेलबाद केले. चक्रवर्थीने ४-०-१६-३ अशी अप्रतिम स्पेल टाकली. हर्षितने सामन्यातील दुसरा झेल टाकला. कुलदीप यादवने नवव्या विकेटसाठी रसिख सलामसह महत्त्वपूर्ण २९ धावा जोडल्या. आजच्या सामन्यात कुलदीप ( ३४*) हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आणि दिल्लीने ९ बाद १५३ धावा उभ्या केल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२४दिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्सकुलदीप यादव