Join us  

KL Rahul भारताच्या वर्ल्ड कप संघात असायलाच हवा होता, रितेश देशमुखच्या मागणीला माजी खेळाडूचं उत्तर

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील T20 World Cup 2024 साठी भारतीय संघाची मंगळवारी घोषणा केली गेली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 7:05 PM

Open in App

Team India Announced for T20 World Cup 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये ९ सामन्यांत ४२ची सरासरी आणि १४४.२७च्या स्ट्राईक रेटने ३७८ धावा करणाऱ्या लोकेश राहुलला ( KL Rahul) भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लोकेशचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांतील रेकॉर्डही चांगला आहे आणि असे असताना दुसरा यष्टिरक्षक म्हणून संजू सॅमसन याला निवडले गेले. संजूने आयपीएल २०२४ गाजवली आहे, परंतु आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त त्याला तितके सातत्य राखता आलेले नाही. आता लोकेश राहुलसाठी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख ( Riteish Deshmukh ) मैदानात उतरला आहे. लोकेश राहुल भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात असायलाच हवा होता असे रितेशने ट्विट केले. 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची मंगळवारी घोषणा केली गेली. हार्दिक पांड्याने संघातील आपले स्थान आणि उप कर्णधारपद टिकवले आहे.  निवड समिती प्रमुख अजित आगरकर, कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची रविवारी नवी दिल्ली येथे बैठक पार पडली. त्यानंतर मंगळवारी आगरकर व द्रविड यांनी BCCI चे सचिव जय शाह यांची अहमदाबाद येथे भेट घेतली. 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंड येथे होणार आहे. त्यानंतर पाकिस्तान ( ९ जून), अमेरिका ( १२ जून) व कॅनडा ( १५ जून)  असे भारताचे सामने होणार आहेत. लोकेश राहुलने ७२ आंतरराष्ट्रीय सामन्यांत २२६५ धावा केल्या आहेत आणि २ शतकं व २२ अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. रितेशने लोकेशसाठी बॅटींग केली आहे आणि तो लखनौ सुपर जायंट्सला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवरही अनेकदा दिसला आहे.   भारताचा वर्ल्ड कप संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), हार्दिक पांड्या ( उप कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह; राखीव खेळाडू - शुबमन  गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद 

 

''आदरपूर्वक सहमत नाही. मी या क्षणी त्याच्या पुढे असलेल्या किमान पाच खेळाडूंचा विचार करू शकतो. चांगला खेळाडू पण तो पुन्हा रांगेत गेला,''असे ट्विट भारताचा माजी फलंदाज हेमांग बदानी याने केलं.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024लखनौ सुपर जायंट्सलोकेश राहुलरितेश देशमुख