CoronaVirus News : लॉकडाऊननंतर बदलणार मेट्रोचा प्रवास, 'ही' सेवा होऊ शकते बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 03:34 PM2020-04-30T15:34:48+5:302020-04-30T16:32:41+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे केंद्र सरकारने देशात मेट्रो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर अनेक गोष्टी बदलणार आहेत.

जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 30 लाखांवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

भारतासह अनेक देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 33,000 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला

प्रवासादरम्यान कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका हा अधिक असल्याने रेल्वे आणि मेट्रो सेवा बंद करण्यात आली.

कोरोनामुळे केंद्र सरकारने देशात मेट्रो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर अनेक गोष्टी बदलणार आहेत.

मेट्रोने प्रवास करताना देखील काळजी घेणं गरजेचं असणार आहे. मेट्रोने प्रवास करताना काय बदल होऊ शकतात हे जाणून घेऊया.

लॉकडाऊननंतर मेट्रो सेवेत महत्त्वाचे बदल केले जाऊ शकतात. तसेच मेट्रो गाड्याच सुरू झाल्यावर सरकार टोकनचा प्रवास थांबवू शकतं.

फक्त कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवासास परवानगी दिली जाऊ शकते. एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे.

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय लॉकडाऊननंतर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) तयार करण्यात व्यस्त आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार सोशल डिस्टंसिंग पाळून मेट्रो सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.

मेट्रो स्थानकांवरील दोन प्रवाशांमधील अंतर, त्यांची तपासणी आणि गर्दी नियंत्रण यांचा उपायांमध्ये समावेश आहे.

स्मार्ट कार्ड रीचार्ज केले जाऊ शकते. मात्र टोकन पॅसेंजरला प्रवास सुरू करताना प्रत्येक वेळी खरेदी करावे लागते.

टोकनसाठी मेट्रो स्थानकांच्या काऊंटरवर लांबच लांब रांगा लागतात. ही गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात येऊ शकतो.

रेल्वे प्रशासनाने प्रवासी वाहतूक बंद असली तरी देशातील मालगाड्या सुरू असून, त्यातून अत्यावश्यक वस्तूंची ने-आण केली जात आहे. पण पॅसेंजर, एक्स्प्रेस यांपासून उपनगरी गाड्या तसेच मेट्रो रेल्वेही आता बंद आहे.